संस्कारित पिढी तयार करण्याचे उद्देश डोळ्यासमोर ठेवून शिवाश्रम नेहमीच कार्य करत असतो त्या पैकी हा एक उपक्रम आहे .लहान मुलांना व्यावहारिक ज्ञान चौकस बुध्दी आणि त्यांचे संभाषण कौशल्य विकसित व्हावे या उद्देशाने शिवशाहीर विजय महाराज तनपुरे यांच्या संकल्पनेतून ग्रामीण भागातील मुलांना समाजाचे व्यवहाराचे ज्ञान मिळावे म्हणून या तिन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यशाळेची रुपरेषा खालील प्रमाणे आहे
सकाळी योगा साठी जाणे.घर झाडून घेणे बाथरूम स्वच्छ करणे स्वतः चे कपडे धुणे.
बाजारातुन 3 वस्तू (भाजीपाला) घेऊन येणे
इलेक्ट्रॉनिक दुकानात जाऊन टिव्ही, फ्रिज यांची किंमत विचारणे (कोटेशन)
संध्याकाळी जवळच्या मित्राच्या घरी जेवायला जाणे. पोहे / शिरा बनवायला शिकणे.
माझा शिक्षक यावर निबंध लिहून शिक्षकाच्या घरी जाऊन त्या पत्रावर सही घेणे.
निरमा, धुण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वस्तू, कमी किमतीत कुठे मिळतील याची माहिती घेऊन किंमत लिहून ठेवणे.
जवळच्या दवाखान्यात जाऊन रुग्णांना दिवाळी चे फराळ देणे.
वरील 3 दिवसांचे कामे आपण स्वतः पुर्ण केली आहे का, यात काय काय चूका झाल्या हे बघून स्वतः स्वताला गुण (मार्क) देणे.
या तिन दिवसीय कार्यशाळेत जे पाल्य आणि पालक उत्कृष्ट सहभाग नोंदवतील त्यांचा सत्कार नवनिर्वाचित आमदार प्राजक्त तनपुरे व ह.भ.प.विजय महाराज तनपुरे यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत 3 नोव्हेंबर रोजी खळवाडी नं.2 स्टेशनरोड राहुरी येथे होईल. या कार्यात मार्गदर्शक आहेत पत्रकार भाउसाहेब येवले, डाँ.सुधीर क्षीरसागर ,डाँ.राजेंद्र वैरागर, भडकत्या ज्वालाचे संपादक सय्यद निसार ,प्रा.गंगाधर रोहकले ,प्रा.शिरीष गुणे ,गोपीनाथ वर्पे सर, प्रा.संजय शेळके व सुरेश चव्हाण लोकवेेधचे संपादक विजय येवले यांनी मार्गदर्शन केले.
त्याच प्रमाणे 25 डिसेंबर 2019 रोजी होणार्या शिवाश्रम च्या लोकार्पण सोहळ्या साठी सर्वांनी उपस्थित रहावे ही विनंती शिवाश्रमाच्या वतीने विजय महाराज तनपुरे यांनी केली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा