Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २ नोव्हेंबर, २०१९

ओला दुष्काळ जाहीर करा,आर्थिक मदतीसह,सरसकट कर्जमाफीची चोपडा काॅग्रेस ची मागणी




चोपडा प्रतिनिधी विनोद निकम :चोपडा मागील अनेक वर्षा पासुन सतत च्या कोरड्या दुष्काळामुळे शेतकरी कर्जबाजारी झालेला आहे.या वर्षी  पर्जन्यमान समाधान कारक झाल्याने शेतशिवारात 

ज्वारी,बाजरी,मका,कापुस आदि पिके विक्रमी उत्पादन होवुन  शेतकरीची आर्थिक परीस्थिती सुधारेल अशी परीस्थिती असतांना आॅक्टोम्बर महिण्याच्या शेवटच्या पंधरवाड्यात झालेल्या बेमोसमी व संततधार पाऊसामुळे कापणीकरून अथवा कापणी योग्य पिके ज्वारी,मका,बाजरी आदि पिके पुर्नअंकुरीत होवु सडली आहेत.ऐन हाता तोंडाशी आलेला हंगाम उघड्या डोळ्यादेखत मातीमोल झाला.आधीच कर्जबाजारी झालेला शेतकरी या संकटामुळे अधीक कर्जबाजारी होवुन आत्महत्येस प्रवृत्त होवु नये म्हणुन शेतकरींना तात्काळ मोठी आर्थिक मदत करून,सरसकट कर्ज माफी देण्यात यावी,विजबीले माफ करण्यात यावीत या आशयाचे निवेदन .तहसिलदार अनिल गावीत  यांना चोपडा तालुका व शहर काॅग्रेस तर्फे जिल्हाध्यक्ष अॅड.संदिप पाटील यांच्या नेतृत्वात  देण्यात आले यावेळी चोपडा तालुकाध्यक्ष राजाराम बापु पाटील,माजी तालुकाध्यक्ष सुरेश सिताराम पाटील,शहराध्यक्ष के.डी.चौधरी,उपाध्यक्ष अॅड.एस.डी.पाटील,अल्पसंख्याक सेल उपाध्यक्ष हाजी महेमूद सैय्यद,  अनिल युवराज पाटील, बी.एम पाटील, राजेंद्र भास्कर पाटील  गोपाल नवल धनगर देवकांत चौधरी ,महेंद्र चौधरी, दिलीप सुमनलाल जैन, तनवीर पिंजारी, उमेश मधुकर पाटील, राहुल अशोक साळुंखे,इस्तीयाक जागीरदार , यशवंत गणपत पाटील, तुकाराम पाटील,संजय सूर्यवंशी ,पंडित चिंतामण पाटील, अविनाश विष्णु पाटील ,मनोज चौधरी आदी काॅग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध