Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१९

शिरपूर तालुक्यातील जुने भामपूर नवे भामपूर जळोद विखरण मुखेड अर्थे बलकुवे परिसरात पिकांची नुकसानीची खासदार डॉ. हिना गावित यांनी केली पाहणी



शिरपूर:प्रतिनिधी : तालुक्यातील  जुने भामपूर नवे भामपूर जळोद विखरण मुखेड अर्थे बलकुवे या शिवारातील अतिवृष्टीमुळे मका ज्वारी कापूस बाजरी सोयाबीन या  पिकांची नुकसानीची पाहणी नंदुरबार लोकसभेचे खासदार डॉ. हिना गावित यांनी केली यावेळी  शिरपूर विधानसभेचे आमदार काशीराम पावरा, जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, तालुका अध्यक्ष राहुल रंधे,  तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, गट विकास अधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पिक नुकसान पाहणी करण्यात आली.

खा डॉ हिना गावित म्हटल्या की, आपले शेतीचे झालेले नुकसान अतिशय गंभीर असून त्याच्या नुकसान भरपाई चे निवेदन केंद्र व राज्यशासनाकडे करेल व सर्व शेतकरी बांधवांच्या पाठीशी केंद्र व राज्य शासन खांभिरपणे उभे आहे थोड्याच दिवसांत या नुकसानीचा मोबदला दिला जाणार आहे.

यावेळी  जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, जिल्हा उपाध्यक्ष किशोर माळी, माजी पं स उपसभापती दीपक गुजर, आदिवासी आघाडीचे रमेश वसावे, किसान मोर्चा  भास्कर बोरसे, बालकीसन पावरा, सरपंच प्रवीण पाटील, कैलास पाटील, आनंदसिंग भंडारी, जगदीश पावरा, नवेष मराठे, जगदीश पाटील, विजय पाटील, जगदीश पाटील, यशवंत धिवरे, दीपक पवार, सुभाष भोई, भटू माळी, तुषार सत्यविजय, मुकेश पाटील, दिनेश पाटील, जगदीश पाटील, छोटू गुजर, भया पावरा, गंगाराम पावरा, डॉ शशिकांत पाटील, प्रदीप पाटील, प्रवीण शिरसाठ, रुपेश बोरसे, जयेश बोरसे, नरेश पवार, राजकुमार पावरा, नितीन धनगर, गंभीर लोहार, रविंद्र पाटील, शेखर माळी, गजु पाटील आदि उपस्थित होते.
---------------------------------------------

माजी मंत्री अमरिशभाई पटेल, आ. काशिराम पावरा, भुपेशभाई पटेल यांच्या प्रयत्नाने आज पिक विमा अधिकारी मार्गदर्शन साठी शिरपुरात
---------------------------------------------




शिरपूर:प्रतिनिधी: पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा आंबिया बहारामध्ये अनेक फळ पिकांसाठी शासनाने भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड मुंबई या कंपनी मार्फत शेतकरी बांधव यांच्या साठी विमा योजना सुरु केली असून शिरपूर तालुक्यातील शेतकरी बांधवांनी फळ पिक विमा योजनेचा तसेच इतर पिकांसाठी योग्य त्या विमा योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन महाराष्ट्र राज्याचे माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री अमरिशभाई पटेल, तालुक्याचे आमदार काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, नगरसेवक तपनभाई पटेल यांनी केले आहे.

मुंबई येथून एका विमा कंपनी चे अधिकारी शिरपूर येथे शेतकरी बांधव यांना पिक विमा योजना समजून सांगण्यासाठी येत आहेत. बुधवार दि. ६ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ वाजता शिरपूर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात यासाठी बैठक घेण्यात येत आहे. यावेळी आमदार काशिराम पावरा, उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रमसिंह बांदल, तहसीलदार आबा महाजन व अन्य अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.

या विमा योजना अंतर्गत गेल्या वर्षी देखील माजी मंत्री अमरिशभाई पटेल, तालुक्याचे आमदार काशिराम पावरा, उपनगराध्यक्ष भुपेशभाई पटेल, नगरसेवक तपनभाई पटेल यांच्या अथक प्रयत्नाने 9 कोटी रुपये पिक विमा रक्कम शेतकरी बांधवांना प्राप्त झाली होती. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध