Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१९

पुण्यात अर्जुनभोई राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्काराने सन्मानित।।।



प्रतिनिधी:पुणे:आंतरराष्ट्रीय स्तरावरील
आयटीयुसी संघटना, राष्ट्रीय स्तरावरील कॉन्फेडरेशन्स आँफ फ्रि ट्रेड युनियन इंडिया (सिएफटीयुआय) आणि राज्यस्तरावरील डाँ बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय व अल्पसंख्यांक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमानाने महाराष्ट्र राज्य गुणवंत शिक्षक पुरस्कार २०१९चा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार हा तक्षशिला विद्यालय आणि महाविद्यालय उल्हाससिटी ठाणे विभागाचे सहशिक्षक आणि लोहारा जिल्हा जळगाव येथील श्री अर्जुनभोई यांना पुण्यात डाँ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनात सपत्नीक पुरस्कार प्रदान करण्यात आला. 




या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मा दत्तात्रय जगताप शिक्षण सहसंचालक महाराष्ट्र राज्य हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून मा दिनकर टेमकर शिक्षण सहसंचालक, मा प्रविण अहिरे शिक्षण उपसंचालक पुणे, श्रीमती अर्चना ओक उपसंचालक शिक्षण आयुक्त पुणे, मा वैजिनाथ खांडके शिक्षण सहसंचालक शिक्षण आयुक्त पुणे, डाँ गोविंद नांदेडे माजी शिक्षण संचालक, डाँ धनराजमाने शिक्षण संचालक उच्च शिक्षण, डाँ गणपत मोरे शिक्षणाधिकारी माध्य. पुणे, मा मुस्ताकशेख शिक्षणाधिकारी मुंबई, आदी मान्यवर आणि संघटनेचे विद्यमान अध्यक्ष सचिव तसेच अन्य पदाधिकारी हजर होते. श्री अर्जुनभोई यांना आता पर्यंत बारबलुतेदार महासंघ महाराष्ट्र आणि धुळे जिल्हा भोईसमाज महासंघ यांच्या मार्फत  महाराष्ट्र समाजभुषण, तसेच पुणे येथे महाराष्ट्र समाजगौरव, खांदेशभुषण, मध्यप्रदेश समाजसाथी, राष्ट्रीयस्तरावरील दिल्ली येथे समाजसेवक या पुरस्कारांनी आता पर्यंत गौरविण्यात आले आहे. पुणे येथील सदर कार्यक्रमात राज्यातील विविध जिल्ह्यातील ४३ शिक्षकांना त्यांच्या शैक्षणिक, सामाजिकस्तरावर करत असलेल्या कार्याचा गौरव मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन करण्यात आला. त्यात खालील शिक्षकांचा सहभाग होता. श्री अर्जुन रामचंद्र भोई ठाणे, ज्ञानदेवसाळवे रायगड, सरीताडफळ पनवेल, डाँ रमेशढवळे लातुर, डाँ राजेश क्षीरसागर नागपुर, भारतम्हस्के दिपक बनसोड औरंगाबाद, डाँ संजय सावंत बीड, वैजिनाथडूकरे घारी, काझीगफुर अकलुज, सतिहोनराव सिद्राम पवार संतोष साळुंखे सर्व बार्शी, सोपानपवार कळंब, सदाशिवपाटील सांगली, दादाराव साळुंखे कराड, भारतकदम पुरंदर, वैशालीजाधव जुन्नर, साबीयाशेख दौंड, वैशालीबांगर कुसळंब, अशोक पाचकुडवे माढा, दिपक बनसोड औरंगाबाद, शेखरफिक पंढरपूर, शरदपवार अहमदनगर, झाडेंसर आणि त्रिवेणीमँडम नांदेड, बाबासाहेब शिंदे आणि प्रशांतबचुटे मुंबई, सुरेखाहांगे रमेशगवळी विलास वाघमारे बाळासाहेब नांदवटे शिवकन्या कदेरकर प्रभाकर वाकचौरे शांतीनाथ नागणे नुरअहमदअंसारी सुनिता निकम शुभांगी कलकेरी सर्व सोलापूर जिल्हा, नामदेव जगदाळे विशाखा तावरे भैय्या साहेब खुने सर्व उस्मानाबाद जिल्हा, भिमराव कदम सुनिता ताम्हाणे चित्रा गवारे भाग्यश्री घोरपडे सर्व पुणे जिल्हा समाविष्ट होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध