Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २९ फेब्रुवारी, २०२०

जिल्हा परिषद उर्दू मुलींच्या शाळेत सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न......


आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन.... 

बोदवड:प्रतिनिधी:शहरातील जिल्हा परिषद उर्दू मुलींच्या शाळेत गुरुवारी सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उदघाटन आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले. व कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा मुमताज बी बागवान होते.

कार्यक्रमात अनेक विद्यार्थीनीनी मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या. त्यात अनेक विद्यार्थिनींनी नृत्य,देशभक्तीपर गीत सादर केले. त्या ठिकाणी उपस्थित डॉ.कलाम फाऊंडेशन,जननायक फाऊंडेशन, विविध क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते व पालकवर्गां कडून सहभागी विद्यार्थिनींना पारितोषिक देण्यात आले.

आमदार चंद्रकांत पाटील यांनी शाळेत उदभवणार्या समस्यां एका महिन्यात सोवणार असल्याचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी भाषणात सांगितले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा परिषद उर्दू मुलींची शाळेच्या मुख्याध्यापक मो.इकबाल सर, शिक्षक आताउर्ररहेमान सर,सादिक सर,न्यामतुल्ला सर,नजमा मॅडम,जावेद सर,आसिफ सर,मजहर सर,मदहत फुरकान, इतफ फातेम या शिक्षकांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. व सूत्रसंचालन जैनुलआबेदीन सर यांनी केले व कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पालक समितीचे मोलाचे योगदान राहिले......


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध