Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, ४ एप्रिल, २०२०

खिर्डी खुर्द येथे रेशन दुकानात अनोख्या पद्धतीने केले धान्यावताप. प्रत्येक रेशनकार्ड धारकांच्या हाताला लावले सॅनिटाईझर.



खिर्डी:रावेर:प्रतिनिधी तालुक्यातील खिर्डी येथे तत्पर फाउंडेशन चे अध्यक्ष तथा रावेर तालुका रेशन दुकानदार संगठणेचे अध्यक्ष गुणवंत पाटील यांच्या स्वस्त धान्य रेशन दुकान मध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी रेशन वाटप करतांना शिस्तबद्ध पद्धती रेशन वाटप करण्यात आले.

तसेच धान्य वाटप दुकानासमोर महिला व पुरुष अश्या दोन स्वतंत्र एक मीटर च्या अंतरावर सोशल डिस्टनसिंगचा नियम पळून तसेच प्रत्येक रेशनकार्ड धारकांच्या हाताला सॅनिटाईझर लावून धान्याचे वाटप या ठिकाणी करण्यात आले.या वेळी खिर्डी तलाठी फिरोज खान,पोलीस पाटील प्रदीप पाटील,सरपंच ज्योती कोळी तसेच तत्पर फाउंडेशन च्या संचालकांनी भेट दिली.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध