Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, ४ एप्रिल, २०२०

ज्ञान प्रबोधिनीने दिला मदतीचा हात



नळदुर्ग:प्रतिनिधी देशभरात कोरोनामुळे सर्वत्र लाॅकडाऊन आहे, त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ येत आहे. यास्थितीत हराळीच्या ज्ञान प्रबोधिनी केंद्राने तीनशे कुटुंबांना मदतीचा हात दिला आहे. 

वात्सल्य सामाजिक संस्था व आरंभ बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या सहकार्याने नळदुर्ग व तुळजापूर परिसरातील गरजवंत कुटुंबाचा सर्वे करून व स्थानिक प्रशासनाला सोबत घेऊन मदत केली जात आहे. 

यामध्ये रेशन कार्ड नसलेल्या अनाथ, भिक्षेकरी, गरीब, भटके-विमुक्त, एकल महिला यांचा समावेश आहे प्रत्येक कुटुंबाला पंधरा दिवस पुरेल एवढे अन्नधान्य देण्यात येत आहे. यात गव्हाचे पीठ, तांदूळ, साखर, बेसन, तेल पाॅकीट, मीठ, बिस्कीटे, इत्यादी वस्तूंचा समावेश आहे. तसेच कोरोना संसर्गजन्य विषाणूचा प्रतिकार करताना कोणती काळजी घ्यावी याबाबत जनजागृती करणारे पत्रके वितरित करण्यात येत आहेत. या अभियानाची सुरुवात नळदुर्ग पाणी फिल्टर शेजारी वास्तव्यास आलेल्या मंगळवेढा येथील भटके-विमुक्त कुटुंबियांपासून झाली. 

          
“या रोगामुळे आमाला बाहेर फिरणे अवघड झाले होते, कुटुंबावर उपासमारीची वेळ आली होती या सामानामुळे आमच्या अडचणी कमी झाल्या” अशी प्रतिक्रिया टोपले विकून उदरनिर्वाह निर्वाह करणाऱ्या कनका गायकवाड यांनी दिली 
सोशल डिस्टन्स ची काळजी घेत झालेल्या कार्यक्रमात नळदुर्ग नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री लक्ष्‍मण राठोड, कार्यालयीन अधीक्षक श्री लक्ष्मण कुंभार, श्री राजाभाऊ सुतार वात्सल्य संस्थेचे मार्गदर्शक श्री. उमाकांत मिटकर, विश्वस्त मनोजकुमार जाधव, प्रवीण म्हमाने, आरंभ संस्थेचे अध्यक्ष श्री.राहुल हजारे, उपाध्यक्ष श्री.विशाल डुकरे, सचीव श्रमिक पोतदार, ॲड.धनंजय धरणे, श्री.पप्पु पाटील, श्री.सुजित सुरवसे यांची उपस्थिती होती.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध