Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, ४ एप्रिल, २०२०

डॉक्टर की देव?



प्रा.रामेश्वर बहारे दहिवद
मो 9623050035

आज माणसाचा रुपात देव मला भेटला
पांढरे शुभ्र एप्रोन घालून देव माझा नटला 
शर्थीने जीव वाचवणारे ते डॉक्टर असतात
म्हणून मला फक्त त्यांचा मधेच देव दिसतात
या समाजाने नाव दिले त्याला डॉक्टर 
पण तोच निघाला खरा आयुष्याच्या एक्टर
आपण मानतो त्या देवाने दरवाजे बंद केले 
परंतु या देवाने 24 तास दरवाजे खुले केले

महामारी सारख संकट बघून मन होत अधीर
तेव्हा देव माझा आपुलकीने देत असतो धीर
जीव धोख्यात घालून जीव आपला वाचवतो
पैसे देण्यास आम्ही मात्र त्याला नाचवतो
जेव्हा आपल्या देशावर दुखाचा डोंगर कोसळतो तेव्हा देव माझा सेवेसाठी 24 तास उभा ठाकतो डॉक्टरांबद्द्ल आत्मीयता कोणाला कशी लागत नाही तरी देखील ते त्यांच्या कर्त्तव्यात तिसभर ही मागे हटत नाही

होतात जेव्हा हल्ले या देवांवर तेव्हा कोणकसे झटत नाही मार खातात हे निष्पाप डॉक्टर तेव्हा आपल्याला लाज कशी वाटत नाही समाज आणि शासन आता तरी देईल त्यांना मान डॉक्टरांशी नीट वागा हीच आहे तुम्हाला भारतमातेची आणअहोरात्र सेवा देणारे डॉक्टर कोरोनाशी ही झुंज देतील तुम्ही फक्त स्वताची काळजी घ्या वेळआलीच तर प्राणही हेच देव वाचवतील


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध