Breaking News बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ३ एप्रिल, २०२०
येत्या रविवारी रात्री ९ वाजता ९ मिनिटे घरात दिवे उजळा- मोदी
नवी दिल्ली:प्रतिनिधी करोनाच्या जागतिक साथीच्या आजाराशी लढा देण्यासाठी आपली सामूहिक शक्ती दाखवणे गरजेचे आहे, त्यासाठी मला आपल्या सर्वांची ९ मिनिटे हवी आहेत, असे सांगत येत्या रविवारी, ५ एप्रिलला रात्री ९ वाजता केवळ ९ मिनिटांसाठी आपल्या घरातील सर्व दिवे बंद करा आणि आपल्या गॅलरीत येऊन किंवा घरात तेलाचे दिवे, मेणबत्ती किवा मोबाइलची फ्लॅशलाइट लावा आणि आपली सामूहिक शक्ती दाखवा, असे आवाहन जनतेला केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी ९ वाजता प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडिओ संदेशात लोकांना हे आवाहन केले आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, 'रविवारी ५ एप्रिलला आपल्याला करोनाच्या संकटाला आव्हान द्यायचे असून प्रकाशाची शक्ती दाखवून द्यायची आहे. यासाठी ५ एप्रिलला १३० कोटी जनतेच्या महाशक्तीचे जागरण करायचे आहे. ५ एप्रिलला रात्री ९ वाजता मी आपले फक्त ९ मिनिटे हवी आहेत. या वेळी तुम्ही तुमच्या घरातील सर्व लाइट्स बंद करा. घराच्या दरवाजात किंवा बाल्कनीत या आणि मेणबत्ती, दिवा किंवा मोबाइलची फ्लॅशलाइट लावा. हे ९ मिनिटे करा'
देशभर सर्व लोक जेव्हा एक एक दिवे उजळतील तेव्हा प्रकाशाच्या महाशक्तीची जाणीव होईल. या मुळे आम्ही एकाच उद्देशाने एक होऊन लढत आहोत अशी भावना मनात जागृत होईल, असे सांगताना हे दिवे जाळताना आम्ही एकटे नाही आहोत याचा संकल्प करू या असे मोदी म्हणाले.
वेळोवेळी देशातील जनतेच्या सामूहिक शक्तीची भव्यता, दिव्यता आणि त्याचा अनुभव घेणे आवश्यक आहे. देश करोनाविरुद्ध इतकी मोठी लढाई लढत असताना आम्हाला जनता जनार्दनाचे विराट रूप, त्यांची अपार शक्ती याचा सतत साक्षात्कार करत राहिले पाहिजे, असेही मोदी पुढे म्हणाले.
५ एप्रिलला रात्री ९ वाजता या ९ मिनिटांच्या काळात कोणालाही बाहेर जायचे नाही, कोणालाही एकत्र जमायचे नाही हे मोदी यांनी आवर्जून सांगितले. २२ मार्च या दिवशी जनता कर्फ्यूचे आवाहन केल्यानंतर लोक संध्याकाळी ५ वाजता थाळी, घंटा इत्यादी वाजवण्यासाठी घरांच्या बाहेर आले होते. कोठे कोठे तर लोकांनी घराबाहेर पडून गर्दीही केल्याचे दिसले. याच कारणामुळे पंतप्रधान मोदी यांनी ५ एप्रिलला रात्री ९ वाजता कुणीही घरातून बाहेर पडायचे नाही असे आवर्जून सांगितले आहे.
पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की, करोना जागतिक साथीच्या आजाराच्या विरोधात देशव्यापी लॉकडाऊनला आज ९ दिवस आहे. दरम्यान तुम्ही सर्वांनी शिस्त आणि सेवाभावाचे दर्शन दिले आहे. आपण घरात एकटे काय करणार असा प्रश्न अनेकांना पडला असेल. काही लोकांना वाटत असेल की, असे किती दिवस घरात राहावे लागणार?... मात्र हा लॉकडाऊनचा काळ अत्यंत गरजेचा आहे. आम्ही सर्वांनी घरात जरूर राहायचे आहे. मात्र यांपैकी कुणीही एकटे नाही. १३० कोटी जनतेची सामूहिक शक्ती प्रत्येक व्यक्तीच्या सोबत आहे.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
प्रतिनिधी : गणेश चव्हण अमळनेर अमळनेर तालुक्यातील शहापूर येथे मंगळवारी (दि. २३ जून) दुपारी विजेच्या तडाख्याने एका युवा शेतकऱ्याचा दुर्दैवी ...
-
▶ वणी प्रतिनिधी लखमापूर येथील दालमिया पॉलीप्रो कंपनीकडून मोठ्या प्रमाणावर जल आणि वायू प्रदूषण होत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी केला आह...




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा