Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २ जून, २०२०
अंगावर वीज पडल्याने बालकाचा मृत्यू...! विजयपुरची घटना...!
पिंपळनेर प्रतिनिधी :अंगावर वीज पडल्याने साडेपाच वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला. तर त्याच्या आईला विजेचा झटका बसला. ही घटना सोमवारी सायंकाळी ४ वाजेच्या सुमारास विजयपूर (ता. साक्री) येथे घडली. सुरज देवचंद अहिरे असे मृत बालकाचे नाव आहे.
पिंपळनेर परिसरात आज दिवसभर ढगाळ वातावरण होते. दुपारी तीन नंतर ढगांचा गडगडाट व विजांचा कडकडाट सुरू झाला. सायंकाळी चार वाजता पाऊस सुरू झाला. त्यावेळी शेतकरी देवचंद हासिराम अहिरे हे पत्नी सुनीता व मुलगा सुरज यांच्यासमवेत शेतात होते. पाऊस सुरू झाल्याने अहिरे परिवार शेतातून घराकडे येण्यास निघाला. त्यावेळी पुन्हा विजेचा कडकडाट झाला.
साडेपाच वर्षाच्या सुरजच्या अंगावर वीज पडल्याने तो ८० टक्के भाजला. तर आईला विजेचा जोरदार झटका बसल्याने ती शेतात फेकली गेली. अशाही परिस्थिीत आई उठली. देवचंद अहिरे यांनी मुलाला उचलून पिंपळनेर ग्रामीण रूग्णालय गाठले. त्याठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक नुक्ते यांनी तपासून सुरजला मृत घोषित केले. लहान मुलाचा डोळ्यासमोर मृत्यू झाल्याने पालकांनी हंबरडा फोडला.
घटनेची माहिती विजयपुरचे पोलीस पाटील आर.एस.गवळी यांनी तलाठी, ग्रामसेवक व पिंपळनेर पोलीस स्टेशनला दिली. तलाठी दिलीप चव्हाण यांनी पंचनामा करून तहसीलदारांना अहवाल दिला.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
आरोपीची पब्लिकने केली यथेच्छ धुलाई अमळनेर: तालुक्यातील एकलहरे येथे कामानिमित्त आलेल्या एका मजुराने अल्पवयीन मुलीची छेड काढल्याने पब्लिक...
-
केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची घोषणा पंतप्रधान आवास योजनेंतर्गत (पीएमएवाय) महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील एकही लाभार्थी बेघर रा...
-
मुलांचा तापी नदीत बुडून मृत्यू अमळनेर: तालुक्यातील निम येथे तापी नदीत पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्...
-
साक्री प्रतिनिधी:- साक्री, दि. 6 मे 2025 (सोमवार) साक्री तालुक्यातील तालुका फळ रोपवाटिका, साक्री येथे तालुका कृषी अधिकारी,साक्री कार्यालयाने...
-
खुनाचा गुन्हा दाखल ,शोधासाठी पोलीस पथक रवाना अमळनेर : तालुक्यातील पातोंडा येथील विद्युत ठेकेदाराच्या भावाला लोखंडी पाईप आणि लोखंडी पहार ने झ...
-
निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरण व नारपार नदीजोड प्रकल्पासाठी दिल्ली येथे जलशक्ती मंत्रालयात झाली यशस्वी बैठक ! अमळनेर-उत्तर महाराष्ट्रातील सि...
-
अमळनेर : बेकायदेशीर गावठी पिस्टल बाळगणाऱ्या पैलाड येथील शिवाजी नगर भागातल्या एका तरुणाला पोलिसांनी अटक करून त्याच्या जवळील २० हजार ५०० रुपय...
-
आतापर्यंतची जिल्ह्यातील या खरीप हंगामातील सलग 4थी कारवाई यामुळे अनाधिकृतरित्या बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे मा. सुनील बोरक...
-
अमळनेर प्रतिनिधी : मुडी, बोदर्डे, कळंबू रस्त्याच्या कडेला असलेले काटेरी झुडुपे प्रवाश्याना त्रासदायक ठरत असून किरकोळ अपघातांना निमंत्रण देत ...
-
कावठे (ता. साक्री, जि. धुळे) – दिनांक 2 जून 2025 रोजी मौजे कवठे येथे खरीप हंगाम मोहिमेचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.या कार्यक्रमात प्रमुख ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा