Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
मंगळवार, २ जून, २०२०
शेळगांव येथील ट्रान्सफॉर्मर दुरुस्त,वीजपुरवठा सुरळीत सुरू...!
परंडा(राहूल शिंदे) दि.१ तालुक्यातील शेळगाव सबस्टेशन येथील वीज पुरवठा करणाऱ्या ३३/११ पवार ट्रान्सफॉर्मर उपकेंद्रातील ५ मेगावॅटचे एक रोहित्र १२ मेला सकाळी जळाल्याने भारनियमन करावे लागत होते.
केवळ एका ट्रान्सफॉर्मरवर विजेचे नियोजन केले होते,फक्त २-३ तास लाईटचा पुरवठा होत होता.एक ट्रान्सफॉर्मरवर नियोजन करणे अशक्य होते.त्यामुळेच भारनियमन करावे लागत होते.या ट्रान्सफॉर्मरवरून परिसरातील २०- २५ गावांना वीजपुरवठा करण्यात येतो.
काल दुपारी ३ वाजता लातूर येथून ट्रान्सफॉर्मर शेळगांव येथे आणण्यात आला व काम अगदी युध्द पातळीवर सुरू करण्यात आले, परतू रात्री अचानक आलेल्या मान्सूनपूर्व पर्जन्यवृष्टीमुळे कामात व्यत्यय आला. व चालू पाऊसात देखील जोडणी काम रात्री उशीरा पर्यंत सुरू होते.कार्यकारी अभियंता व महावितरण संपूर्ण टीम सदर ठिकाणी मुक्कामी होती.ते काम आज दुपारपर्यंत पूर्ण झाले आहे. उद्यापासून सर्व गावातील वीजपुरवठा सुरळीत सुरू होईल.
यासंदर्भात जिल्ह्याचे लोकप्रिय खा.ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी महावितरणचे लातूरचे मुख्यअभियंता यांना निवेदन दिले होते.वीजपुरवठा लवकरात लवकर सुरू करण्याबद्दल चर्चा केली होती.तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री आ.शंकरराव गडाख यांच्यासोबत आढावा बैठक देखील घेतली होती व सतत पाठपुरावा देखील करत होते.
कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी श्री.महेंद्र वाघमारे(कार्यकारी अभियंता उस्मानाबाद),श्री.गणेश पाटील(सहाय्यक अभियंता गुणनियंत्रणउस्मानाबाद),श्री.अमेय वनारी(उप कार्यकारी अभियंता, परंडा),श्री.दत्तात्रय दसपुते(सहाय्यक अभियंता, शेळगाव),श्री.गोकुळ डोके(वरीष्ठ तंत्रज्ञ),श्री.बालवीर शिंदे(तंत्रज्ञ)व महावितरणचे इतर सर्व कर्मचाऱ्यांनी खूप परिश्रम घेतले.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
आरोपीची पब्लिकने केली यथेच्छ धुलाई अमळनेर: तालुक्यातील एकलहरे येथे कामानिमित्त आलेल्या एका मजुराने अल्पवयीन मुलीची छेड काढल्याने पब्लिक...
-
केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची घोषणा पंतप्रधान आवास योजनेंतर्गत (पीएमएवाय) महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील एकही लाभार्थी बेघर रा...
-
मुलांचा तापी नदीत बुडून मृत्यू अमळनेर: तालुक्यातील निम येथे तापी नदीत पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्...
-
साक्री प्रतिनिधी:- साक्री, दि. 6 मे 2025 (सोमवार) साक्री तालुक्यातील तालुका फळ रोपवाटिका, साक्री येथे तालुका कृषी अधिकारी,साक्री कार्यालयाने...
-
खुनाचा गुन्हा दाखल ,शोधासाठी पोलीस पथक रवाना अमळनेर : तालुक्यातील पातोंडा येथील विद्युत ठेकेदाराच्या भावाला लोखंडी पाईप आणि लोखंडी पहार ने झ...
-
निम्न तापी प्रकल्प पाडळसरे धरण व नारपार नदीजोड प्रकल्पासाठी दिल्ली येथे जलशक्ती मंत्रालयात झाली यशस्वी बैठक ! अमळनेर-उत्तर महाराष्ट्रातील सि...
-
अमळनेर : बेकायदेशीर गावठी पिस्टल बाळगणाऱ्या पैलाड येथील शिवाजी नगर भागातल्या एका तरुणाला पोलिसांनी अटक करून त्याच्या जवळील २० हजार ५०० रुपय...
-
आतापर्यंतची जिल्ह्यातील या खरीप हंगामातील सलग 4थी कारवाई यामुळे अनाधिकृतरित्या बोगस बियाणे विक्री करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे मा. सुनील बोरक...
-
अमळनेर प्रतिनिधी : मुडी, बोदर्डे, कळंबू रस्त्याच्या कडेला असलेले काटेरी झुडुपे प्रवाश्याना त्रासदायक ठरत असून किरकोळ अपघातांना निमंत्रण देत ...
-
दिनांक 8 जून 2025 रोजी तालुका कृषी अधिकारी कार्यालय, साक्री यांच्या कार्यालया मार्फत खरीप हंगामपूर्व ग्रामस्तरीय बैठक मौजे शेणपूर, तालुका सा...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा