Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २ जून, २०२०

प्रभाग क्र ८ व ९ येथे थर्मल स्क्रिनिंग व पल्स Oxy मिटर मशीनच्या सहाय्याने२५०० व्यक्तींची तपासणी...!


शिरपूर(प्रतिनिधी) येथील प्रभाग क्र८ व ९ येथील नागरिक, महिला,वृद्ध व बालकांची थर्मल स्क्रिनिंग व ऑक्सि मीटर मशीनच्या सहाय्याने जुनी देना बँक चौक शिरपूर येथे २५०० व्यक्तींची मोफत आरोग्य तपासणी डॉक्टर्स मार्फत करण्यात आली त्याठिकाणी सोशल डिस्टनसिंग ठेऊन  आज तपासनी करण्यात आली उत्कृष्ट नियोजन करण्यात आले.यावेळी डॉक्टर्स क्लबचे सहकार्य लाभले आहे.

प्रभाग क्र ८ व ९ येथे  नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, नगरसेवक किरण दलाल,माजी उपनागराध्यक्षा तथा नगरसेविका सौ छाया शामकांत ईशी, नगरसेविका सौ रेखा सोनू सोनार, माजी नगरसेवक सोनू सोनार, न प शिक्षण मंडळ मा सदस्य शामकांत ईशी व प्रभागारील सामाजिक कार्यकर्ते यांनी नियोजन केले होते.यावेळी डॉक्टर्स क्लबचे अध्यक्ष डॉ सुनिल ईशी,सचिव डॉ अनिल पाटील,डॉ प्रवीण माळी, डॉ विरेंद्र गांगुर्डे, डॉ नरेश वाणी,डॉ श्रेयस भंडारी, डॉ धिवरे विजय चौधरी, मयूर धोबी,आकाश चौधरी, दिनेश चौधरी, संदीप माळी, राहुल माळी, महेंद्र चौधरी, किशोर चव्हाण, मनोज चौधरी, प्रविण चव्हाण यांनी थर्मल स्क्रिनिंग व पल्स Oxy मिटर मशीनच्या सहाय्याने २५०० जणांची मोफत आरोग्य  तपासणी केली गरजूंना औषधोपचार करण्यात आले व काहींना उपजिल्हारुग्णालय याठिकाणी उपचारासाठी पाठविण्यात आले.

यावेळी डॉक्टर्स क्लबचे व जैन मंडपचे सचिन जैन यांचे मोलाचे सहकार्य लाभले. 
यावेळी प्राचार्यडॉ समीर गोयल, बाबूलाल माळी, आत्माराम माळी,रविंद्र माळी, सुरेश माळी सर, प्रमोद मगरे,जयेश महाजन सर, राजेंद्र चौधरी, आशिष चौधरी, महेश चौधरी, रमेश चौधरी सर, दुर्गेश चौधरी, प्रकाश चौधरी,भरत लोहार,विनायक पाटील,राहुल फुलारी,सचिन जैन,जतीन जैन, पंकज जैन,राहुल सोनार,दिनेश चौधरी,गोटू सोनवणे,संदीप पाटील,राजू खाटीक,साजिद  खाटीक,तनविर खाटीक,फारूक खाटीक, शरद अग्रवाल,प्रतिक ईशी,बापू माळी,युवराज जैन,सुरेन्द्र चौधरी,युवराज चौधरीद,संजय ओसवाल,ईश्वर चौधरी,विजय चव्हाण,संजय चव्हाण, बारकू कोळी, साकरिया,गिरीश थोरात, भारत सैंदाने, जितेंद्र सोनार,दिनेश भोई,जितेंद्र धनगर, शेखर पिंजारी, छोटू धनगर, कमलेश सोनार यांचेसह कार्यकर्ते ,सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते, 
यावेळी पोलीस निरीक्षक हेमंत पाटील,सहायक पोलिस निरीक्षक पाटील, आहेर, निवासी नायब तहसिलदार गणेश आढारी, न प मुख्याधिकारी अमोल बागुल पोलीस हेमंत पाटील,रामकृष्ण मोरे,चव्हाण  यांनी भेट देऊन आरोग्य तपासणी शिबीर व  नियोजनाचे कौतुक केले

यावेळी एवढी गर्दी असूनही सोशल डिस्टनसिंग ठेऊन कार्यक्रम केल्याचे दिसून आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध