Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, २ जून, २०२०

व्यसनमुक्ती...!



व्यसन कोणतेही असो
घातकच असे जीवाला
सोडवूनीही सुटत नाही
गुंता जीवनी वाढलेला

व्यसन कधीही वाईटच 
करते सारीच नुकसानी 
कळते त्याचे मोल तेव्हा
होतो अवमान मानहानी

व्यसनाने जीव पुरताच
बनतो कसा नाद वेडा
नको हा नाद चुकीचा
लवकरच त्यास सोडा

करावे वाचनाचे व्यसन 
नको अतिरेकाची खाई
बोल ऐकावेत परक्यांचे
नसावी कसलीच घाई 

व्यसनाची मुक्ती व्हावी
सल्ला परांचाच ऐकून 
मानसिक त्रासही नको
ठेवूयात त्यांना झाकून

सौ. भारती सावंत 
मुंबई

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध