Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २६ जून, २०२१

सोमवार पासून धुळे जिल्ह्यात नवीन निर्बंध…



तरुण गर्जना बातमी :डेल्टा,‌डेल्टा प्लस सारख्या नवीन स्वरूपांमध्ये विषाणूंचा प्रसार होत असल्याने व व्यापाक भौगोलिक क्षेत्रासह 4-5 आठवड्यात तिव्र स्वरुपात कोरोनाची तिसरी लाट वाढण्याची शक्यता असल्यान व डेल्टा प्लसचे रुग्ण आढळून येत असल्याने या विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासकीय पातळीवर कडक निर्बंध लावण्यात आले आहेत.

दि 28 पासून सायंकाळी 5 ते सकाळी 5 वाजेपर्यंत वैद्यकीय आपात्कालीन वगळता मुक्त संचार करण्यास सक्त मनाई करण्यात आले आहे.तसेच सायंकाळी 5 वाजेपावेतो सार्वजनिक ठिकाणी एकाच वेळेस 5 पेक्षा अधिकारी नागरिकांना एकत्र येण्यास मनाई असणार आहे.(पुर्व नियोजीत कार्यक्रम, लग्नसमारंभ,अंत्यविधी वगळुन)

काय सुरु व काय बंद राहणार वाचा सविस्तर…

अत्यावश्यक सेवा परविणारे दुकाने व आस्थापना दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील (मेडिकल आणि वैद्यकीय सेवा वगळता)

अत्यावश्यक वगळता सर्व प्रकारचे दुकाने सोमवार ते शुक्रवार 4 वाजेपर्यंत शनिवार आणि रविवारी पुर्णपणे बंद

शॉपींग मॉल,थेअटर्स,नाट्यगृह मल्टीप्लेक्स,सिंगल स्क्रिन बंद असणार

हॉटेल, रेस्टॉरंट,बार 50 टक्के ग्राहक क्षमतेसह सोमवार ते शुक्रवार 4 वाजेपर्यंत फक्त डायनिंग साठी सुरु राहतील तर शनिवार व रविवारी केवळ पार्सल सुविधा,टेक अवे,घरपोच सुविधा देता येतील..

सार्वजनिक ठिकाणे,खुलै मैदाने,सायकलींग व मॉर्निंग वॉक दररोज सकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत सुरु राहतील…

खाजगी कार्यालय दुपारी 4 वाजेपर्यंत फक्त वर्किंग डे साठीच सुरु राहतील..

शासकीय कार्यालय नियमित वेळेत 50 टक्के कर्मचारींच्या उपस्थितीत सुरु राहतील…

क्रिडा प्रकार व शुटींग व तत्सम स्पर्धा दररोज सकाळी 5 ते 9 पर्यंत सुरु राहतील(आउट डोअर स्पोर्टस ऑनली)

सामाजिक,सांकृतिक,राजकीय, मनोरंजात्मक कार्यक्रम सोमवार ते शुक्रवार दुपारी 4 पर्यंत 2 तासाच्या आत करण्याचे आदेश..

लग्न समारंभ एका वेळेस फक्त 50 लोकांच्या उपस्थितीत दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील..

अंत्यविधी साठी केवळ 20 लोकांची उपस्थिती

सर्व प्रकारच्या बैठका,ग्रामपंचायत ,को ओपरेटीव्ह निवडणूक 50 टक्के क्षमतेसह सुरु राहतील

सर्व प्रकारचे बांधकामे केवळ बांधकामाच्या ठिकाणी मजूर राहत असल्यास असे बांधकाम सुरु राहतील,तथापि 4 वाजेनंतर मजुरांना ये जा कराण्यास मनाई असणार आहे.

कृषी संबधीत कामे दुपारी 4 वाजेपर्यंत सुरु राहतील…

ई कॉमर्स सुविधा अत्यावश्यक सेवा व इतर प्रकारांचे सेवा करीता दररोज सुरु राहतील….

जिम,सलून,ब्युटीपार्लर,,स्पा सेंटर,वेलनेस सेंटर 50 टक्के क्षमतेसह केवळ प्रि बुकींग पध्दने दुपारी 4 पर्यंत सुरु राहतील(एसी चा वापर करण्यास मनाई असणार)

सार्वजनिक वाहतूक 100 टक्के क्षमतेसह सुरु राहतील यात उभे राहुन प्रवास करण्यास मनाई असणार आहे…

माल वाहतूक व्यवस्था केवळ 3 व्यक्तिंकरीता सुरु राहील(चालक,क्लिनर,हेल्पर,)

निर्यात करणारे उद्योग नियमित पणे सुरू राहतील तथापि कामगार मजूर यांची वाहतूक करणारे वाहने स्वतंत्र असतील व ते वाहने वेळोवेळी निर्जंतुकीकरण करावे

आंतर जिल्हा प्रवेश (level 5 मध्ये असलेल्या प्रवास करण्यासाठी पोलीस विभागाकडून ई पास घेणे आवश्यक राहील…

अत्यावश्यक सेवेची निर्मिती- प्रक्रिया करणारे घटक, आस्थापना नियमितपणे सुरु राहतील तथापि कामगार मजूर यांची वाहतूक करणारे वाहने स्वतंत्र असतील व ते वाहने वेळोवेळी निर्जंतुकीकरण करावे

अत्यावश्यक वस्तूंची निर्मिती,निर्यात प्रक्रिया वगळता अन्य प्रकारच्या सर्व कंपन्या,औद्योगिक आस्थापना, सर्व निर्मिती करणारे घटक,सर्व निर्यात करणारे घटक 50 टक्के क्षमतेसह सुरु राहतील…

सर्व शाळा,महाविद्यालय,शैक्षणिक व प्रशिक्षण,कोचिंग क्लासेस बंद राहतील फक्त ओनलाईन दुरस्थ प्रक्रिया सुरु राहतील.

विनामास्क फिरणे गर्दी करणे,सोशल डिस्टंसीगंचे पालन न करणे,व सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर थुकणे या बाबींचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर रक्कम 500 दंड आकारण्याची कारवाई संयुक्त पोलीस विभाग आणि संबधीत स्थानिक स्वराज्य संस्था यांनी करावी..



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध