Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, ११ जुलै, २०२१

कोरोना महामारीच्या काळात गोरगरीब रूग्णांना रूग्णालयात दाखल करणं,त्यांना बेड मिळवून देण्यापासून ते बरा होईपर्यंत सेवा



कृष्णा अरुण महाजन प्रतिनिधी: एरंडोल 
ग्रामीण रुग्णालयात दाखल होणाऱ्या सर्वसामान्य,गोरगरीब कोरोनाग्रस्तांसाठी संपूर्ण कोरोना काळात रोज फलाहार,
सुप,बिर्याणी देऊन सकस आहार देण्याचे उपक्रम राबविले.विकी खोकरे हा तरुण या कोरोना महामारीच्या काळात गोरगरीब रूग्णांना रूग्णालयात दाखल करणं,त्यांना बेड मिळवून देण्यापासून ते बरा होईपर्यंत सेवा देण्याचं काम करत आहे.

एका रुग्णाला धुळ्याला पोहोचवत असताना आॅक्सीजन सिलेंडरचा काॅक तोंडावर आदळून तो गंभीर जखमी झाल्यावही त्याने आधी रूग्णाला रूग्णालयात दाखल केले नंतरच स्वतःवर उपचार केले.सर्व सामान्य गोरगरीब जनतेच्या दृष्टीने तो केवळ कोरोना योद्धाच नव्हे तर रूग्णांसाठी देवदूतच समजला जातो.भीषण कोरोना काळात गेल्या वर्षापासून आपल्या अॅम्बुलन्सच्या माध्यमातून कोरोना रूग्णांसाठी देवदूतासारखी दिवसरात्र सेवा करणाऱ्या आरोग्य दूत विक्की खोकरे यांचा पाचोरा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे "कोरोना योद्धा"म्हणून सन्मान करण्यात आला त्यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध