Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, १० जुलै, २०२१

महावितरण विभागाची थकबाकी न भरल्याने दहिवद ग्रामपंचायतीचा विद्युत पुरवठा खंडित .



तरुण गर्जणा:अमळनेर खेड्यांचा सर्वांगीण विकास हेच ध्येय ग्रामपंचायतीतील लोकप्रतिनिधी यांचे असणे गरजेचे आहे. दहिवद येथील लोक प्रतिनिधी प्रसिद्धीच्या हव्यासापोटी गावांतील मुलभूत गरजांकडे दुर्लक्ष करत आहेत.दहिवद ग्रामपंचायतीच्या अकार्यक्षम कारभारामुळे महावितरण विभागाने दहिवद गावचा वीज पुरवठा खंडीत केला आहे.

गावांत आजही आरोग्य चिकित्सा ,शिक्षा, पिण्याचे शुद्ध पाणी,वीज,गांव अंतर्गत रस्ते ,ऋण सुविधा,शेतकऱ्यांसाठी सुचना व बाजार व्यवस्था,स्वच्छता,घन कचरा नियोजन ,कृषी योजना व विस्तार   या सर्व समस्यांनी गाव त्रस्त असतांना त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे. 

लोकनियुक्त सरपंच हे गांवी राहत नसल्यानेच या सर्व समस्या निर्माण होत असल्याचे गावांतील नागरिक सांगत आहेत. लोकनियुक्त सरपंच हे बाहेरगावाहून येतात फोटो सेशन करतात व मागारी फिरतात असे गावांतील वातावरण असल्याने गावचा सर्वांगीण विकासाला खीळ बसली आहे .गावच्या  मूळ समस्या डोक वर काढू  लागल्या आहेत.दहिवद गावाचा वीजपुरवठा खंडीत झाल्याने गावांतर्गत दिवाबत्ती बंद झाली आहे. 

पिण्याच्या पाण्याचा देखील वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे.वीज पुरवठा खंडीत झाल्यामुळे रात्रीच्या वेळी संचार करणाऱ्या वनजीवांमुळे ग्रामस्थांचा जीवाला अपाय झाल्यास त्याला जबाबदार कोण ? पेरणीच्या तोंडावर ग्रामस्थांना समस्यांना सामोरे जावे लागणार असल्याचे चित्र गावांत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध