Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
शनिवार, १० जुलै, २०२१
समाज कल्याण कर्मचाऱ्यांना मिळणार ऑनलाईन प्रशिक्षण
यशवंतराव चव्हाण विकास प्रबोधिनी (यशदा) व डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था,(बार्टी) पुणे यांच्यावतीने राज्यातील समाज कल्याण विभागातील कर्मचाऱ्यांना प्रशासकीय कामकाजाचे पायाभूत प्रशिक्षण ऑनलाईन देण्यात येणार आहे.अशी माहिती समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांनी दिली आहे.
प्रशिक्षणाच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांमधील कामाचा दर्जा व गुणवत्ता वाढीला लागावी. प्रशासनात गतिमानता व सुधारणा व्हावी. या उद्देशाने हा प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जाणार आहे. तंत्रज्ञानाच्या युगात कर्मचारी अधिकारी यांनी देखील काळानुरूप आपल्या कामकाजामध्ये बदल करणे आवश्यक असून त्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्याबरोबरच त्याचे प्रशिक्षणाची आवश्यकता असल्याचे बाब लक्षात घेत त्या दृष्टीने पावले उचलण्यात आली आहेत.
कर्मचाऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत नुकतेच विविध संवर्गातील निलंबित असलेले कर्मचारी यांच्या सेवा प्रस्थापित केले आहेत. यापूर्वी देखील 11 कर्मचाऱ्यांच्या सेवा पुनर्स्थापित करण्यात आलेल्या आहेत. तसेच अनुसूचित जाती जमातीच्या मुला-मुलींच्या निवासी शाळेतील 21 कर्मचाऱ्यांचा देखील नियमित वेतनश्रेणीचा प्रश्न मार्गी लावण्यात आला आहे.
आयुक्तालयाने कर्मचाऱ्यांच्या हिताचे घेतलेल्या या निर्णयामुळे कर्मचारी वर्गाकडून स्वागत करण्यात येत आहे.
समाज कल्याण विभागाचे कामकाज अधिक गतिमान होण्यासाठी समाज कल्याण विभागाने कर्मचाऱ्यांसाठी कौशल्य विकास, झिरो पेंडन्सी, विविध संवर्गाचे प्रशिक्षण, यासारखे नवनवीन उपक्रम राबविण्यात येत आहेत.तसेच गेल्या अनेक वर्षापासून निलंबित असलेल्या सर्व सेवा पुनर्स्थापित केलेल्या कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी त्यांना समाज कल्याण विभागामार्फत प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे यांनी कळविले आहे.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध ठेवून तिला सात महिन्यांची गर्भवती करणाऱ्या धरणगाव तालुक्यातील निशाणे येथील तरुणांव...
-
रासायनिक खतांचा शेतीत वापर केल्यामुळे 1970 ते 2000 या 4 दशकात शेती उत्पन्न वाढत गेले, पण बागायती व सिंचनाच्या सोयी मोठ्याप्रमाणात उपलब्ध झ...
-
त-हाडी (ता. शिरपूर):नाभिक समाजाचे आराध्य दैवत व भक्तीमूर्ती संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त-हाडी येथे दिनांक ...
-
साक्री नगरपंचायतीस मिळाली शववाहिनी; भाजपाचे सुरेश पाटील,सौं मंगला पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळासाक्री तालुका आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि धुळे जि.प.तर्फे साक्री नगरपंचायतीला वातानुकूलित शववाहिनी मिळाली असून, या सेवेमुळे नागरिकांना...
-
अमळनेर : सख्या अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या धुळे येथील एका विरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
-
-
चाळीसगाव तालुक्यातील पाथरजे येथील तलाठी श्रीमती मोमीन दिलशाद अब्दुल रहिम यांच्यावर लाच घेतल्याचा गंभीर आरोप ठेऊन धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभ...
-
साक्री तालुक्यातील दहिवेल येथील पत्रकार संघाची कार्यकारणी महाराष्ट्राचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार...
-
वनविभागाची गुप्त बातमी वरुन साठवून ठेवलेला मका पिकातील 55 ते 60 लाखाचा सुका गांजा मुद्देमाल जप्त आज दि.८/०४/२०२५ रोजी सांगवी वनविभागातील परि...
-
शिरपूर प्रतिनिधी :- ७ वर्षीय अल्पवयीन आदिवासी मुलीचे अपहरण करून बलात्कार करणाऱ्या बाळा उर्फ अनिल किरोभा काळे वय २८ याच्यावर “भार...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा