Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
बुधवार, १४ जुलै, २०२१
लोकनियुक्त सरपंचाला केले कायमचे मुक्त
मोताळा तालुका प्रतिनिधी -पिंप्रीगवळी गावातील सरपंच यादवराव हुडेकर यांच्या मनामनी कारभाराला व फक्त पदाभोग्या परिस्थितीला कंटाळून ग्रामपंचायत विद्यमान सदस्यांनी दि 14/12/2020 रोजी तहसीलदार मोताळा यांचेकडे अविश्वासाच्या ठरवाची नोटीस दिली होती त्यानुसार अध्याशी तहसीलदार यांनी दिनांक 18/डिसेंबर/ 2020 रोजी खास सभा घेऊन बहुमत सिद्ध करण्यात आले. त्यावेळी यादवराव हुडेकर यांचे विरुद्ध 11 पैकी 10 सदस्यांनी मतदान केले तर 01सदस्य गैरहजर होतें त्यामुळे सरपंच यादवराव हुडेकर यांना एकही मत मिळाले नव्हतं.
यादवराव हुडेकर अगोदर सरपंच राहून गेले आहेत. तसेच माळी समाजाचे तालुका पद सुद्धा त्यांचेकडे होतं त्यामुळे त्याच्यासाठी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्टेची मानली जात होती. बीजेपी सरकार च्या काळातील लोकनियुक्त सरपंच असल्यामुळे त्यांना सदस्यांच्या अविश्वासमूळे पद गमावता आलं नव्हतं त्यासाठी गावातील लोकांनी निवडून दिले,तर पदावरून काढण्याचा अधिकार सुद्धा गावाकऱ्यांचाच आहे असा शासन निर्णय असल्याने, सरपंच यांना कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे 06 महिने सत्ता गाजविण्याची परत एक संधी मिळाली होती.
आज दि 06 मार्च 2021 रोजी तहसीलदार मोताळा यांनी मा. उपजिल्हा अधिकार यांचे आदेशनव्ये पी. गवळी येथे विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली. त्यापूर्वी ग्रामसेवक मापारी यांनी गावातील लोकांना दवंडी देऊन ग्रामसभेमध्ये मतदान करण्याची जागरूकता निर्माण केली. पण एन वेळ कोरोना रुग्ण संख्या वाढल्यामुळे महाराष्ट्र सरकार यांचे आदेशानुसार दि 06/मार्च /2021ला होणारी विशेष ग्रामसभा रद्द करण्यात आली होती. त्यामुळे गावातील सरपंच अधिकार कायम होते. व त्यांना अजून पदभोगण्याची आयती संधी मिळाली होती.त्यांनी संधीचं सोन करण गरजेचे होतं, परंतु कोरोना परिस्थितीत ग्रामसेवक व सरपंच यांचे कडुन समाधानकारक काम न झाल्यामुळे जनतेची नाराजी झाली. व इतर ग्रामविकासाची कामें केली नाही.तसेच निवडणूक लढाताना जो जाहीरनामा वचनपूर्ती सरपंच यांनी केली होती त्यातील एकही काम या तीन वर्षात गावात झाले नाही.
त्यानंतर आज दि 13/जुलै /2021ला सकाळी 10 वा गावात विशेष ग्रामसभा मा. तहसीलदार साहेब मोताळा यांचे आदेशानुसार मराठी प्राथमिक शाळा येथे घेण्यात आली
त्यानुसार गावातील 18 वर्षावरील नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला त्यामध्ये सरपंच व सदस्यांच्या बाजुने मतदान करण्यासाठी दोन वेगवेळी चिन्ह देण्यात आली होती.
सकाळी 10 वा पासुन विश्वास अविश्वास मतदानाला सुरवात झाली ठीक 02.30 मी.वा मतदान वेळ संपली. त्यावेळी एकूण मतदान 274 झाले होतं.व बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी मतमोजणी करून दुपारी 03 वा निकाल घोषित केला. सदर निकालामध्ये सरपंच यांचे बाजुने 79 तर सदस्यांच्या बाजुने 188 असा कौल गावातील मतदारराजांनी दिला.तर 07 मतदान हे अवैध झाले.अश्याप्रकारे सरपंच हुडेकर यांना पराभव स्वीकारावा लागला. सरपंच पराभव झाल्यानंतर विरोधी सदस्य गटाचे जल्लोषाचे वातावरण दिसत होतें.
या राजकीय लढाई मध्ये एक मराठी म्हण मात्र खरी ठरली (गाव करील ते राव काय करणार )ते गावाकऱ्यांनी दाखवून दिले. त्यामुळे यातून इतर गावाचे सरपंच धडा घेतील कि सत्तेचा दुरुपयोग व माज केला तर त्यांचे परिणाम जनता मतदानरूपाने दाखवुन देते.
आता परत चर्चा होतं आहे कि पुढील भावी सरपंचपदासाठी 11 सदस्यांनंपैकी कोणाची वर्णी लागेल. त्यासाठी सदस्यांनमध्ये स्पर्धा सुरु झाली आहे. जाती पतीचे राजकारण होईल कि साम, दाम, दंड, भेद यांचा वापर होईल हे औचित्यचे ठरेलं.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध ठेवून तिला सात महिन्यांची गर्भवती करणाऱ्या धरणगाव तालुक्यातील निशाणे येथील तरुणांव...
-
रासायनिक खतांचा शेतीत वापर केल्यामुळे 1970 ते 2000 या 4 दशकात शेती उत्पन्न वाढत गेले, पण बागायती व सिंचनाच्या सोयी मोठ्याप्रमाणात उपलब्ध झ...
-
त-हाडी (ता. शिरपूर):नाभिक समाजाचे आराध्य दैवत व भक्तीमूर्ती संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त-हाडी येथे दिनांक ...
-
साक्री नगरपंचायतीस मिळाली शववाहिनी; भाजपाचे सुरेश पाटील,सौं मंगला पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळासाक्री तालुका आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि धुळे जि.प.तर्फे साक्री नगरपंचायतीला वातानुकूलित शववाहिनी मिळाली असून, या सेवेमुळे नागरिकांना...
-
अमळनेर : सख्या अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या धुळे येथील एका विरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
-
-
शिरपूर प्रतिनिधी :- ७ वर्षीय अल्पवयीन आदिवासी मुलीचे अपहरण करून बलात्कार करणाऱ्या बाळा उर्फ अनिल किरोभा काळे वय २८ याच्यावर “भार...
-
अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडून महसूल दफ्तरी केले जमा ब्राह्मणे पोलिस पाटील गणेश भामरे यांची धाडसी कारवाई अमळनेर-तालुक्य...
-
वनविभागाची गुप्त बातमी वरुन साठवून ठेवलेला मका पिकातील 55 ते 60 लाखाचा सुका गांजा मुद्देमाल जप्त आज दि.८/०४/२०२५ रोजी सांगवी वनविभागातील परि...
-
चाळीसगाव तालुक्यातील पाथरजे येथील तलाठी श्रीमती मोमीन दिलशाद अब्दुल रहिम यांच्यावर लाच घेतल्याचा गंभीर आरोप ठेऊन धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा