Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, १४ जुलै, २०२१

नगर परिषदेच्या नव्याने बांधण्यात आलेल्या शॉपिंग कॉम्प्लेक्स ला डॉ.अण्णा भाऊ साठे याचे नाव देण्यात यावे.स्वाभिमानीची मागणी.



शेगांव प्रतिनिधी: (उमेश राजगुरे)
जगविख्यात साहित्य सम्राट 
डॉ.अण्णाभाऊ साठे यंदाचे वर्ष जन्म शताब्दी वर्ष म्हणून साजरे होणार असून. त्या निमित्याने डॉ.अण्णाभाऊ साठे यांचे नाव शेगाव शहरात नगर परिषद द्वारे नव्याने बांधन्यात आलेले शॉपिंग कॉम्प्लेक्सला जगविख्यात डॉ. अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना शेगाव शहर वतीने करण्यात आली. 

असून डॉ. अण्णा भाऊ साठे यांचे कार्य पाहता साहित्यसम्राट,शिवचरित्रकार,
शिवशाहिर प्रबोधनकार, इतिहासकार,
अर्थशास्त्रीय जाणीवाणी ओतप्रोत सामाजिक परिवर्तनकार स्वाभिमानी साहित्याच्या उंचीने प्रतीभावन्त व्यक्तिमत्व शोषितांचा वंचितांचा आवाज बुलंद आवाज,भारतीय स्वातंत्र्य चाळवळ सयूक्त महाराष्ट्र चळवळीत क्रातीकारी शिरमणी गोवा मुक्ति सग्रामामध्ये सक्रिय सहभाग असणारे विज्ञानवादी पुरस्कर्त, सत्यशोधक स्वातंत्र समता न्याय आणि बंधूतत्व भारतीय सविधांनाच्या चतुरसूत्रीय भाष्यकार असणारे साहित्यरत्न डॉ. अण्णा भाऊ साठे यांचे यांचे नाव शेगाव नगर परिषद च्या कॉम्प्लेक्स ला देण्यात यावे. अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे शहर अध्यक्ष गोपाल तायडे यांनी निवेदना द्वारे केली आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध