Breaking News बातमी मागील सत्य..!
मंगळवार, १३ जुलै, २०२१
ईडीच्या कस्टडीत असलेले गिरीष चौधरी यांची कोठडी वाढली
खडसेंच्या जावयाची कोठडी वाढली – चौकशी सुरुच
मुंबई प्रतिनिधी: माजी विरोधी पक्ष नेते एकनाथराव खडसे यांचे जावई गिरीश चौधरी यांच्या ईडीच्या कोठडीत नव्याने वाढ झाली आहे. ईडीच्या कस्टडीत असलेले गिरीष चौधरी यांची कोठडी आता 15 जुलै पर्यंत झाली आहे.ईडीने चौकशीकामी एकनाथराव खडसे यांना देखील बोलावले होते.
याप्रकरणी संबंधितांचे जाबजवाब घेण्याचे कामकाज सध्या प्रगतीपथावर आहे. अटकेतील खडसे यांचे जावई गिरीष चौधरी यांची चौकशी बाकी असल्याचे ईडीने न्यायालयास सांगितल्यानंतर त्यांच्या कोठडीत वाढ झाली आहे.
ईडीने केलेल्या आरोपानुसार सन2016 मधे एकनाथराव खडसे महसुलमंत्री असतांना पुणे भोसरी येथील एमआयडीसीच्या मालकीची जमीन गिरीष चौधरी यांनी खरेदी केली होती.पुणे येथील एका उद्योजकाने या व्यवहार प्रकरणी बंड गार्डन पोलिस स्टेशनला तक्रार दिली होती. एसीबीने या तक्रारीचा आधार घेत चौकशी व तपासाअंती एकनाथराव खडसे व त्यांची पत्नी मंदाकिनी खडसे, जावई गिरीष चौधरी यांच्यासह जागेचे मुळ मालक अब्बास उकानी अशा सर्वांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
Tags
About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
पती-पत्नीसह दोन मुलांचा रेल्वेखाली मृत्यू; आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट अमळनेर, दि. २७ ऑगस्ट २०२६ (गुरुवार) : तालुक्यातील टाकरखेडा येथे...
-
सुरगाणा (नाशिक ) माधव खाबिया :- तालुक्यात रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बोगस डॉक्टरांविरोधात आरोग्य विभाग व सुरगाणा पोलिसांनी मोठी धडक मोहीम ...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा