Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, १४ जुलै, २०२१

अरे बापरे हे काय नववूधला "बोनट"वरचा "राऊंड" महागात पडला,पहिल्याच दिवशी गुन्हा दाखल,बघा हा व्हिडिओ



पुणे प्रतिनिधी-भोसरी परिसरातील एका नववधूने चक्क स्कॉर्पिओच्या बोनेटवर बसून धोकादायकरितीने दिवे घाटातून मंगल कार्यालयाच्या दिशेने प्रवास केला. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. कोरोनाच्या संकटातही विशेष काळजी घेत सध्या अनेक ठिकाणी छोटेखानी विवाहसोहळे पार पडत आहेत. परंतु या नववधूने लग्नासाठी जात असताना उत्साहाच्या भरात दिवे घाटातून चक्क मोटारीच्या बोनेटवर बसून मंगल कार्यालयाच्या दिशेने प्रवास केला. मात्र धोकादायक पद्धतीने अशी स्टंटबाजी करताना नववधूला आणि तिच्या कुटुंबियाला कायद्याचा विसर पडल्याचे दिसून आले.


सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेला हा व्हिडीओ पुण्याच्या लोणी काळभोर पोलिसांपर्यंत पोहोचला.त्यानंतर स्कॉर्पिओच्या बोनेटवर बसून मंगल कार्यालय गाठणाऱ्या नववधूवर लग्नाच्या पहिल्याच दिवशी पुण्यातील लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आहे.तसेच या नववधूसोबत तिच्या कुटुंबियांवरही गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध