Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, ४ ऑगस्ट, २०२१

शिरपूर एच.आर.पटेल विज्ञान महाविद्यालयाची पूर्वी अग्रवाल 100 टक्के गुण मिळवून महाराष्ट्रात प्रथम, आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलाच्या सर्व 15 शाखांचा निकाल 100 टक्के



शिरपूर प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, नाशिक विभागीय मंडळ मार्फत जाहीर करण्यात आलेल्या बारावीच्या निकालात शिरपूर येथील आर. सी. पटेल शैक्षणिक संकुलाने आपल्या यशाची उज्ज्वल परंपरा कायम राखली असून शहरातील एच. आर. पटेल विज्ञान महाविद्यालयाची पूर्वी अग्रवाल 100 टक्के गुण मिळवून महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकावला. संस्थेच्या सर्व 15 शाखांचा निकाल 100 टक्के लागला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या वतीने व सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

संस्थेच्या 1675 विद्यार्थ्यांपैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून संस्थेचा निकाल 100 टक्के लागला. 46 विद्यार्थ्यांना 95 टक्के पेक्षा जास्त गुण, 258 विद्यार्थ्यांना 90 टक्के पेक्षा जास्त गुण मिळाले. संस्थेचे 1458 विद्यार्थी म्हणजेच 87.04 टक्के विद्यार्थी विशेष प्राविण्यासह, 216 विद्यार्थी 28.86 टक्के विद्यार्थी प्रथम श्रेणीत यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाले.

संस्थेचे अध्यक्ष माजी शालेय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन पटेल, संस्थेचे कार्याध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, संस्थेचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, उद्योगपती चिंतनभाई पटेल, सर्व संचालक, सीईओ डॉ. उमेश शर्मा, सर्व प्राचार्य यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

विविध शाखांची टक्केवारी, प्रथम पाच गुणवंत विद्यार्थ्यांची नावे, त्यांना मिळालेले टक्के गुण पुढीलप्रमाणे आहेत.
विज्ञान शाखांचे निकाल -

आर.सी.पटेल कनिष्ठ महाविद्यालय शिरपूर (विज्ञान शाखा) 100 टक्के निकाल. नांद्रे हेतन हेमंत 99, पाटील ओंकार चंद्रगोडा 99 टक्के, महाजन दर्शन अमृत 98.33, पवार देवेश प्रमोद 98.17, जैन संयम विनोद 98, सोनवणे जिज्ञेश भिला 97.50 टक्के. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य पी.व्ही. पाटील, सर्व प्राध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले.

एच. आर. पटेल कन्या कनिष्ठ महाविद्यालय शिरपूर (विज्ञान शाखा) 100 टक्के निकाल. अग्रवाल पुर्वी आशिष 100 टक्के, पाटील दिपश्री वसंत 97.33, पाटील प्राची रविंद्र 96.83, चौधरी सिद्धी पुनमचंद 96.50, बागल अनुष्का अविनाश 96.50, देवरे पुनम नागराज 96.33, जाधव चेतना अशोक 96.33 टक्के. या सर्व विद्यार्थिनींना प्राचार्य आर.बी.पाटील, सर्व प्राध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले.

आर. सी. पटेल इंग्लिश मेडीयम सायन्स ज्यु. कॉलेज शिरपूर- 100 टक्के निकाल. पाटील भावेश दिलीप 97, पवार निकिता सुनील 96.83, सांळुखे जागृती सुरेश 96.50, टिळेकर रमा राहुल 96.17, अग्रवाल झिल विजय 95.67, अटवल साक्षी मनोज 95.67. सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य सचिन पाटील व सर्व प्राध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले.

एस.व्ही.के.एम. संस्था संचलित मुकेशभाई पटेल मिलीटरी स्कूल शिरपूर 100 टक्के निकाल. बुलानी मेहक संगीतकुमार 93.33, भोई मानसी अर्जुन 93.33, चौधरी वर्षा राजेंद्र 90.67, पावरा नेहा विनेश 90.33, वाघ हेमंतकुमार मधुकर 90 टक्के. सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य दिनेशकुमार राणा व सर्व प्राध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले.

आर. सी. पटेल विज्ञान कनिष्ठ आश्रमशाळा शिरपूर- विज्ञान शाखा 100 टक्के निकाल. पावरा धिरज दिलवरसिंग 84.50, पावरा दिपक रशीद 81.83, पावरा राहुल चमाऱ्या 81.50, पावरा वंदना रेणा 81.50, पावरा अंकिता विकास 81.17, पावरा करण भाया 80.67. त्यांना प्राचार्य एच. के. कोळी व प्राध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले.

आर.सी.पटेल विज्ञान कनिष्ठ आश्रमशाळा निमझरी- 100 टक्के निकाल. भिल अजिंक्य राजेंद्र 90, पावरा विशाल शांतीलाल 87.83, पावरा पुजा अशोक 86.83, पावरा विनोद श्रीराम 86.50, पावरा मनोज दारासिंग 85.67. त्यांना प्राचार्य पी.डी.पावरा व प्राध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले.

आर.सी.पटेल विज्ञान कनिष्ठ आश्रमशाळा वाघाडी- 100 टक्के निकाल. पावरा निर्मला कमलाल 89.33, पावरा अनिल काशिराम 89, पावरा गोविंद आत्माराम  88.50, पावरा चित्रा दिलीप 87.67, पावरा अंकिता नेताजी 87.50. त्यांना प्राचार्य के.जे. राजपूत व प्राध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले.

आर.सी.पटेल उर्दू विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय शिरपूर- 100 टक्के निकाल. पिंजारी बुशरा नईम 92.67, तेली रजिया बिल्लोद्दीन 92.33, मारिया नफिस अहमद हाशमी 91.67, मलिक सानिया अकिल 91.50, पठाण आरसिज मेहबुब 90. त्यांना प्राचार्य मुबिनोद्दीन शेख व प्राध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले.

आर. सी. पटेल विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, होळनांथे 100 टक्के निकाल. पवार लिना महेंद्र 95.17, ढोले डिंपल ईश्वर 95, जाधव पायल अनार 94.50, मराठे जयश्री रविंद्र 94.17, कापुरे निकिता जगदीश 94. प्राचार्य दिक्षीत व्ही. पी. व प्राध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले.

कला शाखांचे निकाल-
आर.सी.पटेल कनिष्ठ महाविद्यालय शिरपूर (कला शाखा) 100 टक्के निकाल. पवार विद्या राजु 92, अहिरे मयुरी रविंद्र 91.33, माळी गायत्री रविंद्र 90.50, पाटील हर्षदा चंद्रकांत 90.17, माळी दिपाली रमेश 88.67. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य पी.व्ही. पाटील, सर्व प्राध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले.

एच.आर.पटेल कन्या कनिष्ठ महाविद्यालय शिरपूर (कला शाखा) 100 टक्के निकाल. पावरा कमल शोभाराम 93.50, शिंदे गायत्री गोविंद 93.17, पाटील मयुरी मनोहर 92, जावळे मेघा खंडेराव 91.17, पाटील वर्षा हरीश्चंद्र 91. या सर्व विद्यार्थिनींना प्राचार्य आर.बी.पाटील, सर्व प्राध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले.

आर.सी.पटेल कला कनिष्ठ महाविद्यालय खर्दे बु.- 100 टक्के निकाल. पारधी प्रियंका अमृत 90.17, पाटील कविता नरेंद्र 90, मोरे मानसी मनोज 90, शिरसाठ अश्विनी नाना 89.67. त्यांना प्राचार्य व्ही.आर.सुतार व प्राध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले.

आर.सी.पटेल कला कनिष्ठ महाविद्यालय भोरखेडा 100 टक्के निकाल. कोळी मनिषा रतिलाल 91.17, कोळी भाग्यश्री लहु 91, बंजारा प्रविण छोटू 90, परदेशी निकिता संजय 89.50, कोळी हर्षदा धनराज 88.83. त्यांना प्राचार्य एन.सी.पवार व प्राध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले.

आर.सी.पटेल कला कनिष्ठ महाविद्यालय टेकवाडे- 100 टक्के निकाल. शिरसाठ सोनाली दयानंद 90.67, कोळी सोनल सिंकदर 87.67, कोळी कविता मोहन 84.83, भिल मिना भरत 82, कढरे रुपाली दादाभाई 81.83. त्यांना प्राचार्य सिद्धार्थ पवार व प्राध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले.

एच.आर.पटेल कला कनिष्ठ महाविद्यालय वरूळ- 100 टक्के निकाल. ठाकरे मोहीनी लक्ष्मण 92, कोळी छकुली रमेश 91.83, येशी अर्पिता दुर्योधन 91.50, पाटील किरण निंबा 91.33,  शिरसाठ वर्षा मनोहर 91.17.  त्यांना प्राचार्य पी.आर.साळुंखे व प्राध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले.

आर.सी.पटेल कला कनिष्ठ महाविद्यालय खंबाळे- 100 टक्के निकाल. कोळी श्रीराम नंदलाल 92.17, पावरा आकाश देविदास 90.33, पाटील धनश्री रतिलाल 90.17, पाटील दिव्या सतिलाल 88.67, पावरा ईसाक लक्ष्मण 88.50, पावरा राहुल सखाराम 88.50. त्यांना प्राचार्य आर. एफ. शिरसाठ व प्राध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले.

आर.सी.पटेल कला कनिष्ठ आश्रमशाळा शिरपूर- 100 टक्के निकाल. पावरा संतोषी भरत 84.50, पावरा गोपाल चैत्राम 83.33, पावरा द्रौपदी पोपट 82.50, पावरा जगदिश ईमरू 82.17, पावरा कविता कैलास 82. त्यांना प्राचार्य एच.के.कोळी व प्राध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले.

आर.सी.पटेल कला कनिष्ठ आश्रमशाळा निमझरी- 100 टक्के निकाल. पावरा मनिष हुकाऱ्या 91.67, पावरा विजय मेहनवान 90, पावरा योगिता इंद्रसिंग 86.17, डावर प्रियंका नजरसिंग 84.67, भिल विलास अशोक 84.33. त्यांना प्राचार्य पी.डी.पावरा व प्राध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले.

आर.सी.पटेल कला कनिष्ठ आश्रमशाळा वाघाडी- 100 टक्के निकाल. पावरा रुपेश कैलास 93.33, पावरा प्रकाश शंकर 89.17, पावरा रेवसिग राजाराम 89.17, पावरा हितेश पंडीत 89, पावरा उषा कालुसिंग 88.50, पावरा भावसर प्रताप 87.83. त्यांना प्राचार्य के.जे.राजपूत व प्राध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले.

वाणिज्य शाखेचा निकाल- आर.सी.पटेल वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय, शिरपूर 100 टक्के निकाल. देवरे मयुरी संजय 93.50, काळे जान्हवी राजेंद्र 93, बोहरी रुकैया हकीम 90.83, पाटील नंदिनी विठ्ठल 90.33, देवरे अक्षदा दिपक 90.17, पाटील अनिता धुडकु 90.17. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्राचार्य पी.व्ही. पाटील, सर्व प्राध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध