Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १० ऑगस्ट, २०२१

तालुका कृषी विभागाने आयोजित केला रानभाज्या महोत्सव,33भाज्यांचा समावेश.



शिंदखेडा प्रतिनिधी जागतिक आदिवासी दिनानिमित्त तालुका कृषी विभाग आणि आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक नऊ ऑगस्ट रोजी येथील स्वामी समर्थ मंदिराच्या प्रांगणात रानभाज्या महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते तालुका कृषी अधिकारी विनायक बोरसे यांच्या मार्गदर्शनाने या महोत्सवात सुमारे पाचशे महिलांनी सहभाग घेत रानभाज्यांचे महत्त्व जाणून घेऊन सहभाग नोंदवला
शिंदखेडा तालुका कृषी विभाग पण आत्मा योजनेअंतर्गत जागतिक आदिवासी दिनानिमित्त नऊ ऑगस्ट रोजी रानभाज्या महोत्सचे आयोजन करण्यात आले होते. 

या महोत्सवात सादर करण्यात आलेल्या वन भाज्यात तांदूळ अर्धा आंबटचुका शेवगा हादगा फाघोडा घोळ किल्लू अंबाडी आळु पाने गवती चहा गुळवेल पुदिना पिंपळ सुरण कुंभार कवट आघाडा कटोरी चिवळ बांबू आंबोशी पायरी माठ भुईआवळा आधी रानभाज्या समाविष्ट करण्यात आल्या होत्या या महोत्सवात पंचायत समितीचे सभापती सौ सोनवणे यांनी देखील भेट दिली तालुका कृषी अधिकारी विनय बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ कृषी अधिकारी श्रीमती लालन राजपूत नवनाथ साबळे नरडाणा मंडळ कृषी पर्यवेक्षक बीबी पाटील पी जी पाटील ए बी पाटील शरद बोरसे गणेश महाले भरत अहिराव आर एच बाविस्कर कृषी सहाय्यक स्मिता पाटील सुजाता वाघ विद्या पाटील शुभांगी जाधव छाया भवरे मुकेश सोनवणे कांतीलाल साळुंखे शिवाजी मुळे कपिल चौधरी जीवन पिंपळे निंबा पाटील संदीप वाघ संदीप पवार अमोल गोसावी राजू सोनवणे स्वामी समर्थ मंदिराचे प्रशांत पाटील तसेच कालिका देवी महिला बचत गट दरखेडा येथील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध