Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १० ऑगस्ट, २०२१

शिंदखेडा तहसीलदारांची कमाल ! शासकिय नियमाची पायमल्ली ! प्रथम पत्नी हयात असतांना दुसऱ्या स्त्रीशी अनैतिक संबंध !



नाशिक प्रतिनिधी: शिंदखेडा तालुक्याचे तहसीलदार श्री.सुनील महादू सैंदाणे यांनी आपली पहिली पत्नी हयात असताना चक्क दुसऱ्या महिलेशी आपले अनैतिक संबंध ठेवून दुसरा विवाह केल्याबाबत खुद्द त्यांची धर्मपत्नी सौ.वैशाली सुनील सैंदाणे यांनी नाशिक येथील सरकवाडा पोलीस स्टेशन येथे सी. आर. पी. सी. च्या भादंवि कलम ४९४ अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे. 

एखाद्या शासकीय अधिकारी त्यात खुद्द दंडाधिकारी या सारख्या जबाबदार पदावरील व्यक्तीने केलेले हे कृत्य खरोखरच अशोभनीय असेच आहे.इतकेच नव्हे तर त्यानं एकूण चार अपत्य असताना देंखील ते शासकीय सेवेत कार्यरत आहेत.

अश्याप्रकारे त्यांनी शासनालाच फसवले असल्याची तक्रार चक्क त्यांच्या धर्मपत्नी सौ. वैशाली सुनील सैंदाणे यांनी थेट विभागीय आयुक्तांकडे दिल्याने महसूल विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये  चर्चेला उधाण आले आहे.दरम्यान त्यांना चार अपत्ये असून त्यांच्यावर महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाचा दिनांक २८ मार्च २००५ च्या आदेशाचे सर्रास उल्लंघन केलेले असल्याने शासन नियमाप्रमाणे कारवाई करण्यात यावी अशी थेट मागणी विभागीय आयुक्तांकडे त्यांच्या धर्मपत्नी सौ वैशाली सैंदाणे यांनी केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. 

या तक्रारी मागचे सत्य चौकशी झाल्यावरच बाहेर येईल महणून दि.3/8/2021 मा विभागीय आयुक्त कार्यालय नाशिक यांनी शिरपुर उपविभागीय अधिकारी भाग शिरपूर यांना तक्रारींची चौकशीसाठी साठी चे आदेश दिलेले असून त्या संर्भीय पत्र तक्रारदार यांना प्राप्त झाले आहे त्यात  त्यांना 15 दिवसाचा आत आपले लेखी म्हणेणे अथवा नमूद मुद्यातील दस्तऐवज सादर करण्याबाब सांगण्यात आले आहे म्हणून लवकरच खर काय ? ते बाहेर येणार आहे.

एका पीडित स्त्रीच्या तक्रारीला शासन अधिकारी न्याय देतील का नाही याबाबत परिसरात दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे. व त्यावर आमच्या तरुण गर्जना प्रतिनीचे बारीक लक्ष ठेवून आहे. (वाचा सविस्तर पुढील अंकात)



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध