Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ३ ऑगस्ट, २०२१

ना. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सागर बंगला, मुंबई येथून उद्योगपती चिंतनभाई अमरिशभाई पटेल यांनी दिलेल्या मदतीचे वाहन पूरग्रस्तांसाठी रवाना




शिरपूर प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेता तथा माजी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांचे शासकीय निवासस्थान सागर बंगला, मुंबई येथून श्री विलेपार्ले केळवाणी मंडळ मुंबई या नामांकित संस्थेचे उपाध्यक्ष तथा शिरपूर टेक्सटाईल पार्क चेअरमन चिंतनभाई अमरिशभाई पटेल यांनी दिलेल्या मदतीचे वाहन पूरग्रस्तांसाठी रवाना करण्यात आले.

मुंबई येथील श्री विलेपार्ले केळवाणी मंडळ उपाध्यक्ष, उद्योगपती तथा शिरपूर टेक्सटाईल पार्क चेअरमन चिंतनभाई अमरिशभाई पटेल यांनी शिरपूर टेक्स्टाईल पार्क, दिसान ग्रुप तर्फे टॉवेल्स, मदत सामग्री दिली. ही मदत सामग्री महाराष्ट्र राज्यातील अनेक ठिकाणी आलेल्या महापुरात आपद्ग्रस्तांना दिली जाणार आहे.
 
महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेता तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे शासकीय निवासस्थान सागर बंगला, मुंबई येथून मंगळवारी दि. ३ ऑगस्ट रोजी दुपारी २.४५ वाजता रवाना करण्यात आले. यावेळी आमदार निरंजन वसंत डावखरे, येथील श्री विलेपार्ले केळवाणी मंडळ उपाध्यक्ष तथा शिरपूर टेक्सटाईल पार्क चेअरमन चिंतनभाई अमरिशभाई पटेल उपस्थित होते. सदर मदत शिरपूर टेक्सटाईल पार्क, दीसान ग्रुप तर्फे करण्यात आली असून शिरपूर भारतीय जनता पार्टीच्या बॅनरखाली देण्यात आली.

माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, नगराध्यक्षा सौ. जयश्रीबेन अमरिशभाई पटेल,उपनगराध्यक्ष भूपेशभाई पटेल, उद्योगपती चिंतनभाई पटेल व संपूर्ण पटेल परिवार नेहमीच मदतीसाठी पुढे सरसावत असतात,याची प्रचिती नेहमीच येते.

महाराष्ट्रात पावसाने अनेक भागात हाहाकार माजविला,पूरग्रस्त स्थिती निर्माण झाली. त्यात अनेक नागरिक मयत झाले तर अनेक बेपत्ता झाले झाल्याने कुटुंब उद्धवस्त झाले आहेत. यात कोकण व पश्चिम महाराष्ट्रात  ठिकाणी नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झाले आहे. या आपदग्रस्तांना मदतीसाठी शिरपूर येथून पटेल परिवाराने देखील मदतीचा हात पुढे केला. मनापासून मदत करत त्यांनी माणुसकीचे दर्शन घडविले आहे.


(सर्व जण सुरक्षित रहा, स्वतःची काळजी घ्या).

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध