Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, ३ ऑगस्ट, २०२१

विकासरत्न मा.श्री. सरकारसाहेब रावल यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोना योद्धे यांचा प्रशस्तीपत्र देऊन गौरव



दोडांईचा प्रतिनिधी: दोडांईचा शहरात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने अक्षरशः धुमाकूळ घालत असंख्य लोकांचे बळी गेले होते.या महामारीच्या कठीणकाळात आपल्या जिवाची बाजी लावून शहरातील नागरिकांच्या आरोग्याला घातक ठरणाऱ्या या महामारीत रेल्वे स्थानक,बस स्थानक तसेच प्रत्येक प्रभागात कोविड रुग्ण व त्यांच्या संपर्कात आलेल्यांचे,गृहविलिकरण असलेले,कोविड सेंटरला उपचार करणारे आदींचे सर्वेक्षण करुन वरीष्ठपातळीवर अहवाल सादर करुन कोरोना आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत कर्तव्य पार पाडले. अशा या कोरोना योद्धे यांचा विकासरत्न मा.श्री.सरकारसाहेब रावल यांच्या वाढदिवसानिमित्त स्वो.वि.संस्थेचे शिक्षणमहर्षी दादासाहेब राऊळ प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.एम.एस.सोनवणे सर यांच्या हस्ते श्री. संदीप ईशी,भाऊसाहेब पाटील,श्री.अशोक गिरासे, अनिल गिरासे,पंकज गिरासे, कुणाल देसले यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. 

यावेळी जेष्ठ शिक्षक श्री. महेंद्र गिरासे, श्रीम. इंदिरा रावल, श्रीम. रेखा ठाकुर, श्रीम. आशा राऊळ, श्री. हेमंत वंजारी, श्री. निलेश ठाकुर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीम. इंदिरा रावल तर आभार प्रदर्शन श्री. हेमंत वंजारी यांनी केले.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध