Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ६ ऑगस्ट, २०२१

शिरपूर तालुक्यात शिवसेनेकडे युवकांच्या कल असून आगामी काळात तालुक्यातून अनेक युवक हे शिवसेना पक्षात प्रवेश करून कार्य करण्यास तयार




शिरपूर प्रतिनिधी:दि.5 रोजी धुळे येथे शिवसंपर्क अभियान आढावा दौऱ्या दरम्यान विधानपरिषद उपसभापती व शिवसेना प्रवक्त्या निलमजी गोर्हे,मा.कृषी मंत्री नामदार दादाजी भुसे युवासेना सचिव मा.वरूनजी सरदेसाई यांच्या हस्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कट्टर कार्यकर्ते नितीन निकम (शहर सरचिटणीस,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शिरपूर) यांचा संपर्कप्रमुख मा.बबनराव थोरात साहेब,शिवसेना धुळे जिल्हा प्रमुख हेमंत साळुंखे,उप जिल्हा प्रमुख भरत राजपूत,विधानसभा क्षेत्र प्रमुख छोटू सिंग राजपूत,तालुकाप्रमुख दीपक चोरमले, तालुकाप्रमुख अत्तर सिंग पावरा,शहर प्रमुख देवेंद्र पाटील, तालुका युवा अधिकारी अनिकेत बोरसे,तालुका युवा अधिकारी विजय पावरा,महिला आघाडी तालुका संघटिका अर्चना देसले, तुषार महाले,दिनेश गुरव, यांच्या उपस्थिती मध्ये शिवसेनेत प्रवेश करण्यात आला.तसेच मा. निलमताई गोर्हे यांच्या उपस्थितीमध्ये शिरपूर तालुक्यातील माजी महिला तालुकाध्यक्षा (राष्ट्रवादी)जयश्री ठाकरे, माजी महिला शहाराध्यक्षा विशाखा निकम यांचा शिवसेनेत प्रवेश करण्यात आला. 

तसेच लवकरच मुंबई येथे असंख्य कार्यकर्त्यांचा प्रवेश सोहळा देखील होणार असल्याची माहिती देण्यात आली. शिरपूर तालुक्यात शिवसेनेकडे युवकांच्या कल असून आगामी काळात तालुक्यातून अनेक युवक हे शिवसेना पक्षात प्रवेश करून कार्य करण्यास तयार आहेत अशी माहिती स्थानिक पदाधिकाऱ्यांनी दिली आहे त्यामुळे आगामी काळात शिवसेनेत कार्यकर्त्यांची भरती येईल असा आत्मविश्वास व्यक्त केला जात आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध