Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ६ ऑगस्ट, २०२१
Home
/
Unlabelled
/
कोविशिल्ड लस घेणार्यांना कोरोना होण्याची शक्यता ९३ टक्के नाही ! देशातील सर्वांत मोठ्या अभ्यासाचा निष्कर्ष
कोविशिल्ड लस घेणार्यांना कोरोना होण्याची शक्यता ९३ टक्के नाही ! देशातील सर्वांत मोठ्या अभ्यासाचा निष्कर्ष
नवी देहली – कोविशिल्ड लस घेणार्यांसाठी कोरोनाचा धोका ९३ टक्के न्यून झाला आहे, असे एका अभ्यासातून समोर आले आहे. देशात सर्वप्रथम सशस्र दलांचे १५ लाख ९० सहस्राहून अधिक आरोग्य कर्मचारी आणि ‘फ्रंटलाईन वर्कर्स’ यांना कोविशिल्डचे दोन्ही डोस देण्यात आले होते. त्यांच्यामध्ये ‘ब्रेक-थ्रू इन्फेक्शन’ ९३ टक्के न्यून झाल्याचे दिसून आले. त्यावरून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या निष्कर्षामुळे लसींविषयी असलेल्या लोकांच्या शंका दूर होण्यास निश्चित साहाय्य होईल.
१.चंदीगडच्या ‘पीजीआय’ येथे ‘आर्म्ड फोर्सेज मेडिकल कॉलेज’ने ‘ब्रेक थ्रू इन्फेक्शन’च्या प्रमाणावर देशातील सर्वांत मोठा अभ्यास केला. त्याप्रमाणे देशात लसीकरण झाल्यानंतर कोरोना होण्याचे प्रमाण केवळ १.६ टक्के असल्याचे दिसून आले. याचा अर्थ दोन्ही डोस घेतलेल्या १ सहस्र लोकांपैकी केवळ १६ जणांना कोरोनाची लागण होऊ शकते.
२.व्यक्तीने दोन्ही डोस घेऊन दोन आठवडे झाल्यानंतरच त्याला पूर्णपणे ‘व्हॅक्सिनेटेड’ म्हटले जाते. त्यांच्या अभ्यासावरून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. सध्या या अभ्यासातील प्राथमिक निष्कर्ष घोषित करण्यात आले आहेत. या अभ्यासाला ‘विन-विन कोहोर्ट’ असे नाव देण्यात आले. ही माहिती ‘द न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिन’मध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.
३.‘महाराष्ट्र मेडिकल एज्युकेशन ॲण्ड रिसर्च’च्या संचालकांनी त्यांच्या अखत्यारीत असलेल्या २० सरकारी कोविड केअर सेंटरचा अभ्यास केला. त्याप्रमाणे रुग्णालयात उपचारासाठी भरती होणार्यांपैकी ८७.५ टक्के लोकांनी लसीचा डोस घेतला नव्हता, असे आढळून आले.
४. नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी म्हटले की, या लसीकरणामुळे कोरोनाचे संक्रमण होण्याची शक्यता फारच अल्प आहे; परंतु कोणतीच लस ही कोरोना न होण्याची १०० टक्के निश्चिती देऊ शकत नाही. त्यामुळे सर्वांनी कोरोना काळातील निर्धारित नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर : भुसावळ सुरत पॅसेंजर मध्ये अवघ्या एक महिन्याच्या बाळाला टाकून आई वडील अमळनेर स्थानकावर उतरून गेल्याची घटना ९ रोजी रात्री घडली. ...
-
साक्री तालुक्याचे प्रगतीशील शेतकरी श्री विशाल दिलीप खैरनार.में वाय.जी.मोरे सिड्स अँड पेस्टीसाईड चे संचालक यांच्या मौजे विठाई येथील शेतात कलश...
-
नंदुरबार जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नंदुरबार येथून श्री जितेंद्र दामोदर पगारे (सर) नंदुरबार जिल्हा क्रीडा पुरस्कार सन २०२२-२३ पुरस्कार...
-
अमळनेर : आई वडील ऊस तोडायला गेल्याने आसऱ्यासाठी ज्याच्याकडे ठेवले त्या चुलत मामानेच परित्यक्ता भाचीला तिच्या मुलीला मारण्याची धमकी देत...
-
अमळनेर:- अक्कलपाडा धरणातून पिण्यासाठी पाझरा नदीत आवर्तन सोडण्याची मागणी परिसरातील सरपंच उपसरपंच व लोकप्रतिनिधी यांनी केली आहे . यावर्षी ...
-
पारोळ्याच्या फटाका फॅक्टरीच्या तिघा मालकांना दहा वर्षांचा कारावास १६ वर्षांपूर्वी आगीत २१ जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी अमळनेर सत्...
-
मुदतीत बांधणाऱ्यांना वाढीव अनुदान द्या तालुका काँग्रेसचे गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन अमळनेर : तालुक्यातील अनेक शासकीय घरकुल लाभार्थ्यांन...
-
सद्या राज्यात रासायनिक खतांच्या बेसुमार वापराने जमिनींची प्रत बिघडत चालली आहे. सेंद्रिय खतांचा वापर त्यासाठी वाढवताना पोशिंदाचा ऑरगॅनिक खताच...
-
शेवग्याचा मेव्हणा व खवशी च्या आरोपींना अटक अमळनेर प्रतिनिधी : धुळे जिल्हयातील फागणे येथील आपल्या शालकाची विम्याची रक्कम हडप करण्यासाठी शे...
-
बातमी छापली नाही म्हणून पत्रकारांवर होणारे हल्ले ही नित्याचीच बाब झाली असून सांगली जिल्ह्यात महिनाभरात दोन पत्रकारांवर हल्ले झाले असून या घट...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा