Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १२ ऑगस्ट, २०२१

तरुण गर्जनातील बातमीचा इफेक्ट, झोपलेले अधिकारी गडबडून जागे! शिंदखेडा तालुक्यात वाळू माफियांची अवैध वाळू वाहतूकीचे वाहन जप्त..!


                                                          शिंदखेडा : (प्रतिनिधी) शिंदखेडा तालुक्यातील वाळू माफियांबाबत तरुण गर्जना या वृत्तपत्रात दिलेल्या दि. ११ ऑगस्ट रोजीच्या बातमीचा इफेक्ट महसुल अधिकाऱ्यांवर झाल्याचा दिसून येतो. ज्या दिवशी वृत्तपत्रातून बातमी प्रसिध्द झाली त्याच तहसिलदार, मंडल अधिकारी व तलाठी हे खडबडून जागे झाले व त्यांनी तात्काळ अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचा धडाका सुरु केला. 

आमच्या प्रतिनिधीकडे बातमी मिळाली तोपर्यंत त्यावेळेस रात्री ८.३० वाजता तलाठी शिंदखेडा यांनी अक्कडसे येथील ट्रॅक्टर नंबर एम.एच.१८ झेड ७५९७ शिंदखेडा येथे वाळूने भरलेले चोरटी वाहून करताना पकडले ते तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे. ट्रॅक्टर मालकाची राजकीय दडपण टाकण्याच्या प्रयत्न सुरू असल्याची चर्चा दबक्या आवाजात परिसरात आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध