Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १२ ऑगस्ट, २०२१

शिंदखेडा तालुक्यातील अजब महसुल खात्याचा गजब प्रकार, जप्त केलेली वाळू लिलावापूर्वीच गायब,नसलेल्या वाळूचा खोटा लिलाव

    
                                                   
शिंदखेडा : (प्रतिनिधी) शिंदखेडा तालुक्यातील अक्कडसे येथिल जप्त करण्यात आलेल्या वाळु साठ्याचा लिलाव हा बेकायदेशीर पणे करण्यात आला आहे त्या लिलाव संदर्भातील बातमी किंवा जाहिरात कोणत्याही वृत्तपत्रातून देण्यात आलेली नाही. सदरचा लिलाव हा शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार झालेला नाही. लिलाव हा जाहिर पध्दतीने होणे असतांना तो चार भिंतीच्या आत पूर्ण करण्यात आला. लिलाव हा नेमका कोणाला द्यायचा हे पूर्वनियोजित करुनच लिलाव धारक व महसूल खात्याच्या संगनमताने लिलाव प्रक्रिया पार पाडण्यात आली.

शासनाने जप्त केलेला वाळू साठा हा केवळ ४५ ब्रास दाखवण्यात आला. त्यातही सदर वाळू साठ्यातून लिलाव होण्यापूर्वीच वाळूची चोरटी वाहतूक करुन खिसे गरम करुन घेण्यात आले. म्हणजेच जप्त वाळूचा पंचनामा होण्यापूर्वीच लिलाव धारकाने वाळू वाहतूक करुन घेतलेली होती त्यातून लिलाव हा पूर्वनियोजित होता व यास तहसिलदार यांच्या वरदहस्त असल्याचे दिसून येते. जप्त वाळूच्या पंचनाम्यांवर सरपंच याचे पती यांची सही त्यावर आहे.

सदर पंचनामा हा दप्तरी कामकाज दाखविण्यापूरता करुन घेतल्याचा दिसून येते. म्हणजेच त्यांच्या देखील वाळू चोरीला हाथभार असावा अशी शंका निर्माण होते. लिलाव धारकाला त्याठिकाणी वाळूच नाही याची जाणीव व माहिती असतांना देखील सदरचा लिलाव घेण्यात आला. कारण त्याला सम्पूर्ण सहकार्य तहसिलदार साहेबांचेच होते असेच म्हणावे लागेल. आणि म्हणून ४५ ब्रास वाळू वाहतूकीची परवानगी चक्क १५ दिवस देण्यात आली. 

कारण काय? कारण वाहतुक ही नदीतून करावयाची आणि वाहन सापडले की आम्ही लिलाव झालेल्या साठ्यातून वाहतूक करतो आहोत असे दाखवायचा कांगावा करायचा. असा हा सर्व प्रकार तहसीलदार शिंदखेडा यांच्या पुण्याईने सुरूआहे.म्हणून नेमका वाळू माफिया कोण? शासकीय अधिकारी की, .....?


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध