Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, ७ ऑगस्ट, २०२१

मा.आ.श्री.नरेंद्र पवार साहेब प्रदेशाध्यक्ष,भाज पा भटक्या विमुक्त आघाडी महाराष्ट्र राज्य यांना शिरपूर तालुका भोई समाजाच्या समस्यानबाबत निवेदन



शिरपूर प्रतिनिधी: दिनांक...6 ऑगस्ट 2021 रोजी राज्यातील भोईसमाज हा NT / B या भटक्या विमुक्त जातीच्या संवर्गात येतो.स्वातंत्र्यानंतर आजतागायत या भोई समाजाकडे कुणीही लक्ष दिलेले नाही . म्हणून भोई समाज हा विकासापासून वंचित आहे.भोई समजा भटकणारा समाज असल्यामुळे तो एकत्र येत आहे . त्याच्यामुळे राज्यकर्त्यांना त्यांचे महत्व दिसून येत नाही समाज विखुलेल्या स्वरूपात आहे.म्हणून त्याला मिळू नये किंवा न्याय देवू नये ही राज्यकर्त्यांची भावना समाजावर अन्याय करणारी आहे . 

राज्यातील संपूर्ण भोई समाजाला न्याय मिळावा यासाठी खाली नमुद केलेल्या मागण्यांच्या गांभीर्यपूर्वक विचार करून समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपली मदत हवी आहे . आपण या मागण्या शासनाच्या प्रतिनिधी समोर ठामपणे मांडून मागण्या मंजूर कराव्या ही विनंती.भोई समाजाच्या प्रमुख मागण्या :

१ ) भोई समाज आर्थिक शैक्षणिक , सामाजिक दृष्ट्या अनूसूचित जाती पेक्षाही मागास आहे.म्हणून भोयांना क्रिमीलियरची अट रद्द करावी .
२ ) राज्यशासनाकडून जात प्रमाणपत्र पडताळणी १८६१ पूर्वीचा पुरावा मागवला जातो ती अट शिथिल करावी . प्रमाणपत्र मिळणे सुलभ होते .
३ ) भोई समाजाला पण एस.सी. च्या सवलती लागू करावी .
४ ) एन.टी.बी.मधील भटक्या जमातीला राजकीय आरक्षण लागू करा.ग्रामपंचायत पासून तर लोकसभा पर्यंत राजकीय आरक्षण लागू करावे .
५ ) भोई समाजाच्या नावाने स्वतंत्र्य महामंडळ स्थापन करा व भोई समाजाचा प्रतिनिधी महामंडळ मध्ये नियुक्ती करा .
६ ) भोई समाजाच्या मुला मुली करीता महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र वस्तीगृह देण्यात यावे.
७ ) एन.टी.बी.च्या भटक्या विमुक्त समाजाचा घरकुलाचा लाभ मिळावा .
८ ) भोई समाजाचा पारंपारीक काळापासून मच्छिमार व्यवसाय करीत असलेल्या स्थानिक मच्छिमारांना प्राधान्य द्यावे व ठेकेदारी व लीलाव पध्दत बंद करून अमंलबजावणी करण्यात यावी .
९ ) भोई व भटक्या जाती जमातींना अनूसूचित जाती जमाती कायदा १ ९ ८ ९ चे आरक्षण मिळणे बाबत.वरील प्रमाणे निवेदन देतांना समाजाचे अध्यक्ष सी.एम.भोई,माजी अध्यक्ष भाईदास मोरे,तरुण गर्जनाचे संपादक संतोष भोई,
शिरपूर तालुका अध्यक्ष सुभाष भोई,
यशवंत निकवाडे सर रविंद्र सोनवणे, राधेश्याम सोनवणे,भोजराज ढोले,सचिन ढोले,रोहिदास भोई,दिलीप ढोले,इ.असंख्य समाज बांधव उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध