Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
शनिवार, ७ ऑगस्ट, २०२१
Home
/
Unlabelled
/
भटके-विमुक्तांना समाजाचा सर्वांगिण विकासासाठी अनुसूचित जमाती (आदिवासी) प्रमाणे सवलती मिळाव्यात : माजी. आ. नरेंद्र पवार
भटके-विमुक्तांना समाजाचा सर्वांगिण विकासासाठी अनुसूचित जमाती (आदिवासी) प्रमाणे सवलती मिळाव्यात : माजी. आ. नरेंद्र पवार
शिरपूर प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचा कानाकोपल्यात सर्वत्र भटक्या विमुक्त समाज हा मागासलेला असुन देशाला ७२ वर्ष स्वंतत्र मिळालेला झाले तरी सुध्दा भटक्या विमुक्त जातीतील समाजाला रेशनकार्ड,आधारकार्ड,जातीचा दाखला, जात पडताळणी प्रमाणपत्र, जन्म दाखला समाजाकडे नसुन बेघरांना घरे नाहीत, संजय गांधी योजनाचा लाभ नाही अश्या अनेक शासकीय योजना पासुन समाज वंचित आहे.
लोकप्रतिनिधी व शासकिय अधिकारी यांनी या योजनेचा लाभ वस्ता, पाडेमधील भटक्या जातीचा लोकांना मिळवुन देण्यासाठी विशेष योजना आखावी असे आवाहान भाजपा भटक्या विमुक्त आघाडी प्रदेशाध्यक्ष माजी. आ. नरेंद्र पवार यांनी केले. त्यांनी एस. एम. पटेल हाॅल, फार्मसी काॅलेज, करवंद नाका येथे (दि.६ आॅगस्ट) रोजी भाजपा भटके विमुक्त आघाडी तर्फे घेण्यात आलेला कार्यकर्ता मेळावा प्रसंगी मार्गदर्शन करतांना आवाहान केले. मेळाव्याचा अध्यक्षस्थानी आ. काशिराम पावरा हे होते.
माजी. आ. नरेंद्र पवार पुढे म्हणाले कि भटक्या समाजाचा सर्वांगिण विकास होण्यासाठी एस. सी, एस. टी प्रमाणे सवलती मिळाव्यात मात्र आम्हाला सवलत देतांना कोणत्याच समाजाचे नुकसान न होता मिळाव्यात असे आवाहान त्यांनी शासनाला केले. यावेळी आ. काशिराम पावरा, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष बबनराव चौधरी, भटक्या विमुक्त आघाडी प्रदेश सहसंयोजक अशोक चोरमले, महिला प्रदेशाध्यक्षा डाॅ. सौ. उज्जवलाताई हाके, युवती प्रदेशाध्यक्षा अॅड. सौ. भाग्यश्री ढाकणे, उत्तर महाराट्र संयोजक नवनाथ ढगे, प्रा. संजय पाटील यांनी मार्गदर्शन केले.
यावेळी व्यासपिठावर जि.प. अध्यक्ष तुषार रंधे, उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक संपत नागरे, शिरपूर भाजपा तालुकाध्यक्ष किशोर माळी, शहराध्यक्ष हेमंत पाटील, धुळे भाजपा मा. जिल्हा सरचिटणीस अरुण धोबी, बोराडी उपसरपंच राहुल रंधे, जि. प. सदस्य योगेश बादल, भटक्या विमुक्त आघाडी प्रदेश सदस्य रविंद्र भोई, धुळे जिल्हाध्यक्ष पिंटु बंजारा, तालुकाध्यक्ष अरविंद्र जाधव, नगरसेवक गणेश सावळे, सामाजिक कार्यकर्ते अमोल पाटील, उत्तर महाराष्ट्र युवक संयोजक बदुलाल राठोड, प्रदेश प्रसिध्दी प्रमुख प्रमोद परदेशी, प्रदेश कार्यालय प्रमुख राज खैरनार, संजय आसापुरे, चंद्रकांत पाटील, सुनिल चौधरी, बापु लोहार, राधेश्याम भोई, मुबीन शेख, सतीश गुजर, पं.स. सदस्य दर्यावरसिंग जाधव, माजी सदस्य अजमल जाधव, बन्सीलाल जाधव आदि उपस्थित होते.
प्रास्ताविक किशोर गोपाळ यांनी केले मेळावा यशस्वितेसाठी चंद्रकांत जाधव, विशाल धनगर, लक्ष्मण गोपाळ, शिवानंद चव्हाण, रोहिदास गोपाळ, ओंकार पवार, विजय गोपाळ, जितेंद्र जाधव, भरत राठोड, हर्षल बुवा, किसन जाधव, श्रावण चव्हाण, प्रेमराज साठोड, संतोष जाधव, लोटन धनगर, अशोक चव्हाण, अनार जाधव, बाच्छु राठोड, दरबार जाधव आदिंनी परीश्रम घेतले. सुत्रसंचालन विजय बागुल सर तर आभार अरविंद्र जाधव यांनी मानलेत.
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध ठेवून तिला सात महिन्यांची गर्भवती करणाऱ्या धरणगाव तालुक्यातील निशाणे येथील तरुणांव...
-
रासायनिक खतांचा शेतीत वापर केल्यामुळे 1970 ते 2000 या 4 दशकात शेती उत्पन्न वाढत गेले, पण बागायती व सिंचनाच्या सोयी मोठ्याप्रमाणात उपलब्ध झ...
-
बेटावद (ता. शिंदखेडा) : बेटावद परिसरात शेतकऱ्यांवर अन्यायकारक प्रकार घडल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. गावातील शेतकरी मनोज दोधू...
-
त-हाडी प्रतिनिधी :-भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या निर्देशानुसार संपूर्ण भारतात राबविण्यात येत असलेल्या आर्थिक समावेशन मोहिमेअंतर्गत सेंट्...
-
शिरपूर प्रतिनिधी : थाळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हिसाळे गावात पोलिसांनी मोठी कारवाई करत जुगार अड्ड्यावर छापा टाकला आणि गावठी दारूची हातभट...
-
त-हाडी (ता. शिरपूर):नाभिक समाजाचे आराध्य दैवत व भक्तीमूर्ती संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त-हाडी येथे दिनांक ...
-
अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडून महसूल दफ्तरी केले जमा ब्राह्मणे पोलिस पाटील गणेश भामरे यांची धाडसी कारवाई अमळनेर प्रतिनि...
-
अमळनेर : सख्या अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या धुळे येथील एका विरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
-
साक्री नगरपंचायतीस मिळाली शववाहिनी; भाजपाचे सुरेश पाटील,सौं मंगला पाटील यांच्या हस्ते लोकार्पण सोहळासाक्री तालुका आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन आणि धुळे जि.प.तर्फे साक्री नगरपंचायतीला वातानुकूलित शववाहिनी मिळाली असून, या सेवेमुळे नागरिकांना...
-
कोपरगाव प्रतिनिधी:- मा.राजेश देशमुख साहेब आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई, मा. प्रसाद सुर्वे साहेब सह आयुक्त अ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा