Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, १६ ऑगस्ट, २०२१

चोपडा तालुक्यातील पार उमर्टी ता वरला जि बडवानी येथील रहिवासी व युवक सुलेंद्रसिंग प्रितमसिंग बर्णाला यास चार गावठी कट्टे व चार जिवंत मक्झिनसह पकडण्यात चोपडा ग्रामीण पोलिसांना यश



चोपडा प्रतिनिधी: चोपडा तालुक्यातील पार उमर्टी ता वरला जि बडवानी येथील रहिवासी व युवक सुलेंद्रसिंग प्रितमसिंग बर्णाला यास चार गावठी कट्टे व चार जिवंत मक्झिनसह पकडण्यात चोपडा ग्रामीण पोलिसांना यश आले आहे.

चोपडा तालुक्यातील सातपुडा भागांतील शेवटचे गाव उमरटी व त्या गावाला लागूनच मध्यप्रदेश राज्यातील पहिले गाव पार उमरटी येथे गावठी कट्टे मिळत असल्याने अनेक कारवाया पोलिस यंत्रणेमार्फत होत असतात.आरोपी सुलेद्रसिंग प्रितमसिंग बर्णाला वय २० याने चार गावठी कट्टे व चार जिवंत मक्झिन उमरटी येथील विजय कहारू पावरा रा उमरटी यांचे शेतातील झोपडीतील लोखंडी पेटीत लपवल्याची गुप्त माहिती पोलिसांना प्राप्त झाल्याने सदर शेतातील झोपडीची झाडाझडती घेतली असता झोपडीतील लोखंडी पेटीत १०७०० रुपये किमतीचे चार गावठी कट्टे व चार जिवंत मकझिन मिळून
आल्याने आरोपी सुलेद्रसिंग प्रितमसिंग बर्णाला याच्या विरोधात चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात पो ना शशिकांत पारधी यांच्या फिर्यादी वरून गु र नं १५५/ २०२१ हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास चोपडा ग्रामीण पोलिस स्टेशनचे सहा पो नि संदिप आराक यांच्या मार्गदर्शनाखाली पो हे कॉ लक्ष्मण शिंगाने करीत आहेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध