Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, १६ ऑगस्ट, २०२१

सरपंच व तत्कालीन ग्राम विकास अधिकारी यांच्या विरुध्द विस्तार अधिकारी भिमराव गरुड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल..!



शिवखेड़ा प्रतिनिधी:ग्रामपंचायतीत अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन सरपंच व ग्रासेवकविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.5 लाख 34 हजार 343 रुपयांचा अपहार झाल्याबाबत पंचायत समितीच्या विस्तार अधिकारींनी सदर गुन्हा दाखल केला आहे.

शिंदखेडा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी भिमराव गरुड यांनी शिंदखेडा पोलीस स्टेशन येथे दिलेल्या फिर्यादीत म्हटल्यानुसार तालुक्यातील चिमठाणे येथे सरपंच खंडु वंजी भिर व तत्कालीन ग्राम विकास अधिकारी महेंद्र पंढरीनाथ महिरे यांनी पदावर असतांना सन 2017 – 2018 च्या ग्रामनिधीमधून 29 हजार 510 रुपये व 14 वित्त आयोग 2017 – 2018 मधील 47 हजार 900 व 2019 – 2020 मधील 14 व्या वित्त आयोग मधील रक्कम 4 लाख 56 हजार 936 अशी एकुण 5 लाख 34 हजार 343 रुपयांचा वेळोवेळी वैयक्तिक फायद्याकरीता संगमताने विविध योजनांच्या विकास कामासाठी खर्च केल्याचे दाखवून परस्पर शासकीय रक्कमेचा अपहार केला.याबाबत सरपंच व तत्कालीन ग्राम विकास अधिकारी यांच्या विरुध्द विस्तार अधिकारी भिमराव गरुड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वर्षाभरापूर्वी याबाबत गटविकास अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली होती.त्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार करण्यात आली होती.व नंतर थेट विभागीय आयुक्तांकडे लढा सुरु होता.चौकशी दरम्यान तत्कालीन 3 ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती.याबाबत शिवसेनेचे नेते भरत पारसिंग राजपूत यांनी या प्रकरणाचा पाठपुरावा केला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध