Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २० ऑगस्ट, २०२१

आयशरमध्ये अवैधरित्या गुरांची वाहतुक साडेआठ लाखाचा मुद्देमाल जप्त..!



शिरपूर प्रतिनिधी:थाळनेर पोलिसांनी अवैध वाहतूक करणाऱ्या गुरांवर कारवाई करीत वाहनासह तब्बल साडे आठ लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
थाळनेर पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे रुजू झाल्यापासून त्यांनी सातव्यांदा अवैध गुरे वाहतूक करणारे वाहन पकडले आहे.
दि.१८ऑगस्ट रोजी दुपारी ५ वाजता शिरपूर चोपडा रस्त्यावर करण्यात आली.

थाळनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे यांना आयशर गाडीत गुरे भरून सेंधवाकडून चोपडा कडे त्यांची वाहतुक केली जाणार असल्याची माहिती मिळाली होती. यानुसार थाळनेर पोलिस ठाण्यातील कर्मचारी यांनी नागेश्वर गावाच्या जवळ सापळा रचुन ठेवला. आयशर गाडी क्रमांक एच आर ३८ ए ए ६७९३ ही येताच या गाडीला अडविले. पोलिसांनी तपासणी केली असता गाडीत गुरे ही दाटीवाटी ने कोंबून असल्याचे दिसले. या कारवाईत पोलिसांनी ६ लाख रुपये किंमतीची आयशर गाडी तर २ लाख ६८ हजार रुपये किमतीच्या १२ गुरे असा एकूण आठ लाख ६८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. 

याप्रकरणी चालक महावीर चौथमलची कुमार राहणार इंदिरा कॉलनी केशव स्कूलच्या जवळ विष्णुनगर जिल्हा अजमेर ( राजस्थान ) याच्या विरोधात हवालदार प्रकाश मालचे यांच्या तक्रारीवरून थाळनेर पोलीस ठाण्यात प्राणी प्रतिबंधक कायदा १९६० चे कलम ११ (घ) (च) (ड) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश बोरसे,नवनाथ रसाळ,मनोज कुवर,नरेंद्र पवार, सिराज खाटीक यांनी केली आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध