Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २१ ऑगस्ट, २०२१

शिंदखेडा येथील मराठे परिवाराच्या वतीने कानबाई माता उत्सव साजरा

    
                              
शिंदखेडा प्रतिनिधी:शिंदखेडा शहरातील मराठे परिवार पारंपारिक पद्धतीने सालाबादाप्रमाणे कानबाई माता मोठ्या उत्साहात साजरी करित असतात.मात्र गेल्या वर्षीपासून महाराष्ट्र सह देशात कोरोणा महामारीने जनतेला त्रासले आहे.त्या पाश्वभुमीवर मराठे परिवार तर्फे हयावर्षी साध्या पद्धतीने उत्सव साजरा करण्याचे ठरविले होते.

परंतु मराठे परिवारातील विश्वास व प्रेम शहरवासियांकडुन आवरले गेले नाही.शहरातील प्रतिष्ठित मान्यवर सह नातेवाईक,मित्र परिवार यांनी कोरोणाचे नियम पाडत हजेरी लावली.त्यात शिंदखेडा पोलीस स्टेशन चे पी.आय.सुनील भाबड ,पी.एस.आय.गजानन गोटे,नगरपंचायत गटनेते अनिल वानखेडे,उपनगराध्यक्ष दीपक देसले,विरोधी पक्षनेते सुनील चौधरी,माजी उपनगराध्यक्ष उल्हास दादा देशमुख,नगरसेवक किरण चौधरी डॉ सुजय पवार दिपक अहिरे,उदय देसले , बाळासाहेब गिरासे,शरद पाटील,रिंकू गोसावी.संतोष वाघ.अरुण देसले .दिपक चौधरी.गुलाबराव बडगुजर मोहन मराठे . रमेश मुळे अमोल मराठे.विनोद देसले . महेंद्र बडगुजर अमोल शिंपी आप्पा चित्ते मुकेश बडगुजर .अमोल वाघ.मनिष माळी .मोनुराजे देसले किरण दादा देसले यासह अनेक मान्यवरांचा समावेश होता.कानबाई उत्सवासाठी मराठे परिवारातील नारायण दौलत मराठे,अरुण बाबुराव मराठे ,महेंद्र मराठे ( सायं.दै.मर्डर पत्रकार) अनिल मराठे ,दिपक मराठे,यासह परिवारातील सदस्य यांनी आभार मानले.विसर्जनासाठी शहरातील पाटण रोड नदीकिनारी श्रीजी बजाज शोरुमचे सुनील चौधरी यांनी खास सोय उपलब्ध करून दिली होती.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध