Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, ५ ऑगस्ट, २०२१

साक्री तालुक्यातील दहिवेल भागाचा आदिवासी क्षेत्राचा व क्षेत्राबाहेरील अंगणवाड्या केंद्रांना देण्यात येणारा आहार खराब अवस्थेत आढळला





साक्री प्रतिनिधी :आज रोजी 05/08/2021 साक्री तालुक्यातील दहिवेल भागाचा आदिवासी क्षेत्राचा व क्षेत्राबाहेरील अंगणवाड्या केंद्रांना देण्यात येणारा आहार उदाहरणार्थ चिक्की चिक्की फ्रुट प्रोटीन वडी माल हा दहिवेल अंगणवाडी क्रमांक 5 येथे सर्व अंगणवाड्या साठी दिनांक 28/4/ 2021 उतरविण्यात आला परंतु हा माल वाटपच न झाल्यामुळे खराब अवस्थेत आढळला प्रत्यक्ष मा.जिल्हा परिषद सदस्य खंडू पोसलू कुवर तसेच मा.सौ संगीता गणेश गावित यांचे प्रतिनिधी गणेश गावित सामाजिक कार्यकर्ता यांनी भेट दिली असता अत्यंत निकृष्ट दर्जाची चिक्की आढळून आली. 

सदर हा माल एकात्मिक बाल विकास कार्यालय साक्री येथे ठेवायला हवा होता परंतु सीडीपीओ मॅडम यांनी हा माल दहिवेल येथे उतरण्यास सांगितले असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे पडले सदर प्रकरणाची तात्काळ चौकशी व्हावी आणि दोषींवर कारवाई करण्यात यावी.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध