Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १९ ऑगस्ट, २०२१

पुरग्रस्त ड्रायव्हिंग स्कुल मालकांना मदत ! म रा ड्रायव्हींग स्कूल मालक संघटना ठरली देवदूत



शेगाव शहर :प्रतिनिधी( उमेश राजगुरे) पश्चिम महाराष्ट्रात महापुरात नुकसान झालेल्या ड्रायव्हींग स्कूल मालकांना म रा ड्रायव्हींग स्कूल मालक संघटनेने आर्थिक मदत देवून आधार दिला आहे. पूरग्रस्तांसाठी म रा ड्रायव्हींग स्कूल मालक संघटना देवदूत ठरली.
 
चिपळुण, रत्नागिरी, सांगली, कोल्हापुर व कल्याण इ. ठिकाणी जुलैमध्ये पावसाने कहर केल्याने आलेल्या पुरात स्थानिक ड्रायव्हिंग स्कुल मालकांचे अतोनात नुकसान झाले. पुरग्रस्त ड्रायव्हिंग स्कुल मालकांना मदत म्हणून "महाराष्ट्र राज्य मोटर ड्रायव्हिंग स्कुल मालक संघटना" तर्फे ₹ १००००/- प्रत्येकी देण्यात आले. सर्वात जास्त नुकसान झालेल्या, श्रुतिका ड्रायव्हिंग स्कुल, चिपळुण यांना संघटने तर्फे मारूती स्विफ्ट कार देण्यात आली. 

या प्रसंगी संघटनेचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर वाघुले कार्याध्यक्ष श्री संतोषकुमार जैस्वाल यांनी संघटनेच्या पुरग्रस्त मदतनिधी ला मदत करणाऱ्या सभासदांचे आभार मानले.  पुरग्रस्त निधीस सढळ हस्ते मदत करणारे महेशजी शिलीमकर व विजय कुमार दुग्गल यांचा सत्कार संघटनेचे खजिनदार  देवराम बांडे यांनी केला.अशी माहिती श्रीगुरूदेव मोटार ड्रायव्हिंग स्कुल शेगांव चे संचालक तथा महाराष्ट्र राज्य ड्रायव्हिंग स्कुल मालक संघटनेचे संघटक ज्ञानेश्वर कुकडे,संघटनेचे महासचिव सोपान ढोले यांनी दिली.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध