Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, १९ ऑगस्ट, २०२१

बेकायदेशिर स्टोन क्रेशर मशिन सुरु, आवश्यक ते पर्यावरण प्रदुषण दाखले नाहीत गौण खनिज उत्खनननाचे सर्वच नियम धाब्यावर, अधिकारी मात्र सुस्त..!



शिंदखेडा (प्रतिनिधी) शिंदखेडा तालुक्यातील बऱ्याचश्या स्टोन क्रेशर मशीन हे अनधिकृत बेकायदेशिरपणे सुरु असून खडीसाठी आवश्यक असलेल्या डबर उत्खननाची कुठलीही शासकीय परवानगी न घेता अवैध मार्गाने उत्खनन सुरु आहे. तसेच ज्या ठिकानी स्टोन क्रेशर सुरु आहेत त्या ठिकाणाचे पर्यावरणाचे पुरेसे शासकीय दाखले उपलब्ध करुन घेतलेले नाही.

उत्खनन ज्या ठिकाणी केले जाते त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जमिनीचा -हास होतो व पर्यावरण समतोल ढासळला जातो.
यासाठी शासनाने उत्खनन केलेल्या जागेबाबत सर्रास उल्लंघन करून उत्खनन सुरूच आहे. यातील निम्म्यापेक्षा जास्त स्टोन क्रेशर हे विनापरवाना सुरु असतांना देखील शासनाचे महसुल अधिकारी सुस्तपणे झोपल्याचा कांगावा करीत आहे. 

यात सार्वे, वायपूर व चांदगड या परिसरातील आदिवासी बांधवांना अल्पशा रकमेचे लालच दाखवून त्यांच्या जमिनी नोटरी करुन उत्खनन सुरुच आहे. व त्या आदिवासी बांधवांच्या जमिनी आहेत तिथं कोणत्याही प्रकारचे पर्यावरणाचे दाखले किंवा मंजुरी नसतांना सर्रास उत्खनन सुरू आहे. यात तुळजा भवानी स्टोन क्रेशर, चक्रधर स्टोन क्रेशर, गोविंद स्टोन क्रेशर, कृष्णा स्टोन क्रेशर, सिध्दार्थ स्टोन, सुनिल साई स्टोन क्रेशर. शिवस्टोन क्रेशर या स्टोनक्रेशर धारकांचे बेकायदेशीरपणे आदिवासींच्या जमिनीवर मोठया प्रमाणात उत्खनन केलेले आहे व करत आहेत.

सार्वे वायपुर व चांदगड शिवार येथील जमिनीवर हे उत्खनन सुरूआहे.शासनाने याकडे लक्ष दिल्यास १०० ते १५० कोटी चा शासनास कर यांचाकडुन वसुली होऊ शकतो असे असतांना शासनाकडून पगार घेणारे शासकीय अधिकारीच जर कानाडोळा करीत असतील तर गैर मार्गाने बुडविलेला कर या शासकीय अधिकाऱ्यांकडून का वसूल करण्यात येवू नये? असे सर्वसामान्य जनतेकडून विचारण्यात येत आहे.का करतात यामागचे सत्य समजून घेणे महत्वाचे आहे. (सविस्तर पुढील अंकात)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध