Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

बुधवार, १८ ऑगस्ट, २०२१

भूतवडा येथे शिक्षक आपल्या दारी हा उपक्रम संपन्न.

जामखेड (राहूल शिंदे)दि.17 रयत शिक्षण संस्थेचे श्री नागेश विद्यालय जामखेड चे प्राचार्य मडके बी.के यांच्या मार्गदर्शनाखाली भूतवडा येथे  शिक्षक आपल्या दारी हा उपक्रम घेऊन विद्यार्थ्यांच्या अडचणी व महाराष्ट्र सेतू अभ्यासक्रम व रयत शिक्षण संस्थेचा  ROSE-V प्रकल्प या संदर्भात चर्चा करून मार्गदर्शन करण्यात आले. विविध विषयांच्या कृतीपत्रिका सोडून घेण्यात आल्या. तसेच covid-19 संसर्ग संदर्भात विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी यावर मार्गदर्शन व जनजागृती करण्यात आली.
      
श्री नागेश विद्यालयातील शिक्षक शिंदे बी एस , भोसले एम.के यांच्या नियोजनाखाली उपक्रम संपन्न झाला.या उपक्रमासाठी उपमुख्याध्यापक तांबे सर  व पर्यवेक्षक साळवे सर यांचे सहकार्य मिळाले.

या उपक्रमात  पाचवी ते दहावी चे भूतवडा गावातील विद्यार्थी सहभागी झाले.
श्री नागेश विद्यालयाचा या उपक्रमाचे ग्रामस्थांनी कौतुक करून हा उपक्रम चांगला आहे असे मत व्यक्त केले. तसेच विद्यार्थी व शिक्षकांची समक्ष भेट झाल्यामुळे विद्यार्थी आनंदित होते.
       
या वेळी विश्वनाथ डोके, विठ्ठल भिवा डोके,सुनिल  बबन मोरे, महादेव काशिनाथ डोके पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध