Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०२१

शिरपूरात पुन्हा गांजाच्या शेतीवर कारवाईसव्वा दोन लाखाचा गांजा जप्त, अज्ञातावर गुन्हा दाखल



शिरपूर/प्रतिनिधी:शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान शिवारातील पिरपाणीपाडा ते सोजापाडा या कच्चारस्त्या दरम्यान असलेल्या वनक्षेत्र जमिनीवर गांजाची शेती आढळून आली.यात शिरपूर तालुका पोलिसांनी कारवाई करून दोन लाख २५ हजार रुपये किमतीची ११२ किलो वजनाची गांजाची झाडे जप्त केली. शिरपूर तालुक्यात वारंवार गांजाची शेतीवर कारवाई होत असतांना दिसून येत असून एवढा मोठ्या प्रमाणावर गांजाचे बियाणे आले कुठून असा प्रश्न उपस्थित होत आहे.

शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान शिवारातील पीरपाणीपाडा ते सोजापाडा या कच्च्या रस्त्यादरम्यान परिमंडळ सूळे येथील वनक्षेत्र भोरखेडा कंपार्टमेंट क्रमांक १०२० या वनक्षेत्र जमिनीवर एका शेतात अज्ञात व्यक्तीने मानवी मेंदूवर विपरीत परिणाम घडवणारा अमली पदार्थ अर्थात गांजाची अवैधरित्या लागवड केली असल्याची गुप्त माहिती शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट यांना मिळाली. 

त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट यांनी पोलिस कर्मचारी व वनरक्षक वनपाल यांचे पथक तयार करून दिनांक २५ रोजी सायंकाळी ०५:३४ वाजेच्या सुमारास या ठिकाणी छापा टाकला, तेव्हा तेथे अज्ञात व्यक्तीने गांज्याची लागवड केलेली एक ते दीड फूट उंचीची झाडे दिसून आलीत पथकाने गांजाची झाडे मुळासकट उपटून एका प्लॅस्टिकच्या गोणीत भरून जप्त केली. या कारवाईत दोन लाख २५ हजार ६०० रुपये किंमतीची व ११२ किलो ५०० ग्रॅम वजनाची गांजाची ओली झाडे जप्त केली, या प्रकाराने तालुका पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल कुंदन प्रल्हाद पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध एनडीएस कायदा १९८५ चे कलम २० व २२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. सदर घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक वारे करीत आहेत. 

सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव, पोलीस उपअधीक्षक अनिल माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक सुरेश शिरसाट,जमादार लक्ष्‍मण गवळी, हेड कॉन्स्टेबल हेमंत पाटील,साईद शेख, पोलिस कॉन्स्टेबल प्रकाश भील,योगेश दाभाडे,योगेश मोरे,संतोष पाटील यांनी केली.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध