Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

गुरुवार, २६ ऑगस्ट, २०२१

शिंदखेडा आगार प्रमुखांचे दुर्लक्ष,ग्रामीण भागातील जनतेची गैरसोय



शिंदखेडा : (प्रतिनिधी) सध्या महाराष्ट्र्रात लॉक डाऊन शिथिल करण्यात आले असून अद्याप शिंदखेडा आगारातुन खेड्यातील जनतेकरिता गाड्या सुरू करण्यात आलेल्या नाहीत.त्यामुळे अक्कडसे, सोनेवाडी,नेवाडे वरपाडे,अंमळथे,या भागातील नागरिकांची गैरसोय होत आहे त्यांना खाजगी गाड्यांचे जास्तीचे भाडे देऊन प्रवास करावा लागतो आहे.  

त्याही गाड्या भरल्या शिवाय जात नाही म्हणून महत्वाच्या कामाकरिता  वेळेत पोहचणे शक्य होत नाही.विद्यार्थ्यांना देखिल आपल्या शिक्षणा पासून वंचित राहावे लागत आहे.काही गावात खाजगी गाड्या राहत नाही म्ह्णून महिला भगिनींना फाट्यावरून 2 ते तीन किलो मीटर पायी चालत जावे लागते..म्हणून तात्काळ बस सेवा सुरू करण्यात यावी अशी मागणी परिसरातून होत आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध