Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

मंगळवार, १७ ऑगस्ट, २०२१

बदनामी केल्या प्रकरणी मधुकर जाधव यांच्या विरोधात अब्रू नुकसानी चा दावा करणार असल्याचा सरपंच ज्ञानेश्वर पाटील यांचा इशारा….. जाधवानी आरोप सिद्ध केल्यास राजकारणातुन संन्यास घेईन अन्यथा विरोधकांनी गाव सोडण्याचे पाटील यांचे आव्हान.....



शिदखेड़ा प्रतिनिधी: बाबळे गावाचे माजी सरपंच पती मधुकर हिलाल जाधव यांनी दोन दिवसांपूर्वी बाबळे चे लोक नियुक्त सरपंच ज्ञानेश्वर पाटील यांच्या विरोधात भ्रष्टाचारा चे गंभीर आरोप करत प्रशासनाला निवेदन दिले होते. त्यांच्या आरोपाला उत्तर देण्यासाठी सरपंच ज्ञानेश्वर पाटील यांनी ग्रामपंचायत कार्यलयात पत्रकार परिषद घेऊन आरोपांचे खंडन केले आहे.

तसेच 2018 च्या निवडणुकीत जाधव यांच्या मुलाचा निवडणुकीत पराभव केल्याने त्यांनी राजकीय सूड बुद्दीने भ्रष्टाचारा चे खोटे आरोप लावल्याचे पाटील यांनी सांगितले. त्यांच्या आरोपत कुठलेही तथ्य नसून माझ्या वरील आरोप सिद्ध केल्यास राजकारणातुन संन्यास घेईन अन्यथा आरोप सिद्ध न झाल्यास जाधव यांनी गाव सोडावे असा इशारा ज्ञानेश्वर पाटील यांनी राजकीय विरोधक असणाऱ्या मधुकर जाधव यांना दिला आहे. तसेच खोटे आरोप लावून बदनामी केल्या प्रकरणी जाधव यांच्या विरोधात अब्रू नुकसानी चा दावा दाखल करणार असल्याचे सरपंच ज्ञानेश्वर पाटील यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.

गेल्या अनेक वर्षा पासून जाधव यांची ग्रामपंचायत मध्ये सत्ता होती त्यांनी गावाचा विकास करण्याऐवजी स्वतःचा विकास केल्याचा गंभीर आरोप पाटील यांनी जाधव यांच्या वर केला आहे. जाधव यांचे मानसिक संतुलन बिघडल्याने ते वायफळ बड बड करत असल्याचे देखील ते म्हणाले. तसेच मधुकर जाधव हा गुन्हेगारी वृतीचा माणूस असून त्याच्या विरोधात अनेक पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल असून गावातील नागरिकांमध्ये दहशत निर्माण करून दादा गिरी करत असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे.

मधुकर जाधव हे पदावर असताना गावठाण च्या जागेवर अतिक्रमन करून स्वतः चे घर बांधले असून त्याच्चा विरोधात कोर्टात गेलो असून लवकरच त्याचा निकाल लागणार असल्याचे पाटील म्हणाले. या गुंड प्रवृत्ती च्या मधुकर जाधव यांच्या वर शासना ने कारवाई करण्याची मागणी देखील सरपंच ज्ञानेश्वर पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

या प्रसंगी पोलीस पाटील विलास पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य कैलास पाटील, ग्रामपंचायत सदस्य नाना भिल, माजी ग्रामपंचायत सदस्य रामदास भिल, ग्रामपंचायत सदस्य रामदास ठाकरे, हिरालाल पाटील यांच्या सह ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध