Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शनिवार, २८ ऑगस्ट, २०२१

‘नो हेल्मेट-नो पेट्रोल’ या पोलिस आयुक्तांच्या महत्त्वाकांक्षी योजनेला नाशिककरांचा सकारात्मक प्रतिसाद



नाशिक प्रतिनिधी: ‘नो हेल्मेट-नो पेट्रोल’ या पोलिस आयुक्तांच्या महत्त्वाकांक्षी योजनेला नाशिककरांचा सकारात्मक प्रतिसाद लाभला आहे.या मोहिमेची अंमलबजावणी सुरु झाल्यानंतर शहरातील ८० टक्के दुचाकीस्वार हेल्मेटचा वापर करताना आढळून आले आहेत. तर खोटी कारणे दाखवून हेल्मेटशिवाय पेट्रोल घेणाऱ्या ७२ चालकांचे वाहन परवाने निलंबित करण्याचा प्रस्ताव प्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठवण्यात आहे आहेत.

शहर वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त सीताराम गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे. शहरातील वाहतूक सुरळीत व सुरक्षित रहावी यासाठी पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून शहरात ‘नो हेल्मेट-नो पेट्रोल’ या मोहिमेच्या अंमलबजावणीस प्रारंभ झाला.दुचाकी चालकाची सुरक्षितता हाच या मोहिमेचा हेतू असल्याने नाशिककरांचा त्यास सकारात्मक प्रतिसाद लाभला आहे. या मोहिमेत पेट्रोल पंप चालक-मालकांचाही सहभाग मोलाचा ठरला आहे. 

जे दुचाकीस्वार पेट्रोलपंपावर विना हेल्मेट येतात त्यांच्याकडून फॉर्म ‘अ’भरुन घेतला जातो. या फॉर्ममध्ये मूद करण्यात आलेल्या कारणांची शहानिशा शहर वाहतूक शाखेतर्फे घरी जाऊन करण्यात येते. ज्या दुचाकीस्वारांनी खोटी माहिती भरुन पेट्रोल घेतले अशा ७२ चालंकाविरुद्ध मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम १२९/१७७ अन्वये दंडात्मक कारवाई करुन त्यांचा वाहन परवाना निलंबित करण्याचे प्रस्ताव प्रादेशिक परिवहन विभागाकडे पाठवण्यात आले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध