Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

रविवार, २९ ऑगस्ट, २०२१

अमळनेर दहिवद येथे महिला ग्रामसभा व जनरल ग्रामसभा संपन्न..!



अमळनेर प्रतिनिधी:दिनांक 26/8/2021 रोजी महिला ग्रामसभा व दिनांक 27 /8/2021 ला जनरल ग्रामसभा संपन्न झाली.कोव्हिडं 19 नियमांचे पालन करुन सुरुवात झाली ह्या ग्रामसभेला गावातील लोकनियुक्त सरपंच सुषमा वासुदेव पाटील हे ग्रामसभा अध्यक्ष होते.दहिवद च्या इतिहासात पहिल्यांदा एव्हड्या मोठ्या प्रमाणात ग्रामस्थांचा प्रतिसाद मिळाला.
ग्रामसभेची सुरवात श्री संजीव एस.सैंदाणे
ग्रा.वि.अधिकारी दहिवद यांनी केली.अध्यक्ष यांचा परवानगी ने ग्रामसभेला सुरुवात झाली.


गावातील विविध विकास कामाबद्दल चर्चा, जलजीवन मिशन अंतर्गत तापी नदी वरून पाणी पुरवठा योजने संदर्भात चर्चा, घनकचरा व्यवस्थापन योजनेविषयी चर्चा, वृक्षलागवड संदर्भात चर्चा,लेबर बजेट तयार करण्याविषयी चर्चा,महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत वयक्तिक लाभार्थी निवड,sc/st बंधुसाठी घरकुल योजना, 15वा वित्त आयोगाचा निधी खर्च करण्याविषयी चर्चा,फेरी वाल्यासाठी कर लावण्याची चर्चा,10 टक्के महिला बालकल्याण वर खर्च,15 टक्के sc - st बंधुसाठी खर्च,5 टक्के दिव्यांग खर्च माजी सेनिक करमाफी यांवर चर्चा,कोव्हिडं 19 च्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनेवर चर्चा,महिला सबलीकरण वर चर्चा,पाणी पुरवठा समिती निवड,ग्रामरोजगार सेवक क्र.2 भागवत सोनवणे यांची निवड,
ग्रामरोजगार सेवक क्र.1 शामकांत उर्फ पंकज जयव़ंत पाटील  यांच्या विषयी महिलांची तक्रार झाल्यावर रोजगार सेवक यांना पदावरून एकमुखाने काढण्याचा निर्णय झाला,आयत्या वेळचे विषयावर  चर्चा ,गावातील तलाठी यांनी शेतकऱ्यांना माहिती दिली,तसेच आरोग्यसेवक यांनी माहिती दिली.अश्या अनेक विषयांवर एकमताने ठराव आज ह्या ग्रामसभेत पारित झाले.

यावेळी गावांतील उपसरपंच सुनिल पाटील,बाळू पाटील  सदस्य, वैशाली माळी सदस्य,रेखा पाटील सदस्य, शिवाजी पारधी सदस्य, रवींद्र माळी सदस्य,मालुबाई माळी सदस्य, आशाबाई माळी सदस्य,वर्षा पाटील सदस्य, जि.प.शाळा मुख्याध्यापक
गावातील आशा स्वयंसेविका ताई,आरोग्य सेवक,अंगणवाडी सेविका- मदतनिस ताई,गावातील बचत गट च्या महिला भगिनी,ग्रामस्थ,रोजगार सेवक,ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.शेवटी ग्रामसभेचे अध्यक्ष यांनी ग्रामसभेत आलेल्या ग्रामस्थांचे व महिलांचे आभार मानले व ग्रामसभा संपली असं जाहीर केलं.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध