Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, ४ ऑक्टोबर, २०२१

साथीच्या आजारात वाढ होऊ नये म्हणून साक्री येथे प्रभाग क्रमांक 5 मध्ये स्वखर्चाने केली धुरळणी,भाजपचे महेंद्र देसले यांचा उपक्रम



साक्री शहरात साथीच्या आजारांनी आपले पाय पसरल्यामुळे नागरिक मोठ्या प्रमाणात धास्तावले आहेत.अशा परिस्थितीत डासांच्या उत्पत्तीमुळे होणाऱ्या आजारांपासून नागरिकांचे रक्षण व्हावे, या उद्देशाने साक्रीतील प्रभाग पाच मध्ये भाजप ओबीसी मोर्चाचे तालुकाध्यक्ष महेंद्र देसले यांनी स्वखर्चातून धुरळणी करीत नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले आहे.


गेल्या दोन वर्षापासून करोणाचे संकट सर्वदूर पसरले आहे. अशात सुरु असलेल्या पावसाळ्यामुळे साथीचे आजार मोठ्या प्रमाणात बळावले आहेत. डेंग्यू, चिकन गुनिया, मलेरिया, टायफाईड अशा आजाराने ग्रस्त रुग्णांनी दवाखाने फुल्ल असल्याचे पहावयास मिळते आहे. शहरातील नागरिक डेंग्यू, चिकन गुणिया, मलेरिया, टायफॉईड आदि आजारांनी बेजार झाले आहेत. अशा परिस्थितीत डास, मच्छर यांच्या उत्पत्ती मुळे होणाऱ्या आजारांपासून प्रभागातील रहिवाशांना दूर राहता यावे या उद्देशाने महेंद्र देसले यांनी प्रभागातील विद्या नगर, गुरुदत्त नगर, श्री. शिवाजी नगर भाग एक आणि दोन, महावीर नगर, टाटीया नगर,प्रसाद नगर, गोपाळ नगर, समता नगर,अरिहंत नगर,साईराम नगर, साईनिर्माण पार्क, सानेगुरुजी नगर,बाबा आमटे आश्रम शाळा आदी रहिवासी क्षेत्रात तसेच मोकळ्या भूखंडांवर स्वखर्चातून फवारणी करीत प्रभागातील नागरिकांना दिलासा दिला आहे.

सद्या नगर पंचायतीवर प्रशासक नियुक्त करण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत शहराच्या नवीन वाढलेल्या भागात नगरपंचायत प्रशासनाचे काम करतांना दूर्लक्ष होत असल्याचे वारंवार पहावयास मिळते. मात्र स्वतःहून पुढे सरसावित जागरूक नागरिक म्हणून श्री. महेंद्र देसले यांनी स्वखर्चाने धुरळणी करीत प्रभागातील डास, मच्छरांच्या निर्मूलनासाठी आणि त्यांच्यापासून उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांना पायबंद घालण्यासाठी उचललेल्या पावलाचे स्थानिक रहिवाशांकडून कौतुक केले जात आहे. तर दुसरीकडे अशा फवारणीमुळे साथीच्या आजारांवर नियंत्रण येणार असल्यामुळे समाधान देखील व्यक्त होत आहे.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध