Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
सोमवार, ४ ऑक्टोबर, २०२१
धुळे पोलिसांच्या धडाकेबाज 'कामगिरी मुळे शहरातील नागरिकांना दिलासा!
धुळे प्रतिनिधि: जिल्ह्यासाठी प्रवीणकुमार पाटील यांनी जिल्हा पोलिस अधीक्षकपदाचा कार्यभार स्वीकारला. एखाद्या बॅटसमनने मैदानात उतरता उतरताच षट्कार व चौकारांची उधळण करावी त्याप्रमाणे त्यांनी आल्या आल्या ज्या कामगीरी नोंदविल्या आहेत त्या ' तारीफे काबिल 'आहेत.आताच 'हाउज द जोश ' म्हणता येणार नाही.
परंतू त्यांनी याच प्रकारे आपली यंत्रणा मोबिलाईज करणे सतत सुरु ठेवले तर काही कालावधि नंतर तसेही म्हणण्याची सुसंधी धुळे जिल्हा वासियांना मिळू शकेल. त्यांचा कार्यकाळ सुरु झाला आणि रात्रीच्या पेट्रोलिंग मध्ये त्यांच्या यंत्रणेला एटीएम कार्ड क्लोनिंग करून देशभरात अनेकांना लाखोत गंडा घालणाऱ्या आंतरराज्यीय टोळीला गजाआड करण्याची कामगीरी नोंदविता आली.
दिल्ली,मुंबई,पुणे व देशातीत विविध राज्यात विविध शहरात नागरिकांचे एटीएम क्लोनिंग करून लाखोंमध्ये त्यांना गंडा घालण्याचे काम ही हरियाणाची टोळी करीत होती. अनेक तक्रारीनंतर त्यांच्या मोडस ऑपरेंडीचा अभ्यास करून त्यांना धुळे पोलिसांनी अलगद ताब्यात घेतले. त्यातून देशभरात अशा अनेक गुन्हयांची उकल होवू शकते.डीएसपी प्रवीणकुमार पाटील यांनी रुजु झाल्यावर क्राईम चार्ट पाहून चोऱ्या व घरफोडयांच्या संख्येबाबत चिंता व्यक्त केली होती.
त्यानंतर तेवढ्यावरच न थांबता त्यांनी उपाययोजनाही सुरु केली आहे. त्यांनी रात्री बारा ते पहाटे तीन ही घरफोडयांची वेळ बघता नेमक्या याच वेळात ' मिशन ऑल आवूट ' सुरु केले आहे. जिल्ह्याला महाराष्ट्र दिनी नवी कोरी २२ फोर व्हिलर व २० टू व्हिलर वाहने मिळाली आहेत.त्याचाही उपयोग झाला पाहिजे. त्याचा या मिशन ऑल आवूट मध्ये उपयोग होत आहे.सलग तीन दिवस पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांच्यासह जिल्ह्यातील १७ पोलिस ठाण्यांचे अधिकारी,पोलिस दलाचे कर्मचारी यांनी मिळून ही मोहिम राबवित आहेत.
यात महामार्गावर नाकाबंदी,नोटेड गुन्हेगारांची तपासणी,फरार संशयित रात्री घरी सापडतात म्हणून या वेळेत त्यांचा शोध हद्दपार गुंड रात्री शहरात वास्तव्यास येतात त्यांचा शोध घेतला जाणार.बहुतेक गुन्ह्यांची हीच वेळ असते व याच वेळी पोलिस दल ग्राऊंडवर असेल तर अशा संभाव्य गुन्ह्यांना निश्चितच आळा बसू शकतो.एरव्ही पोलिस दल नेहमीच टीकेचा धनी असतो मात्र एखाद्या संस्थेस चांगले व्हिजन असणारा प्रमुख मिळाला तर त्या संस्थेची कार्यक्षमता व गुणवत्ता देखील वाढते.खान्देशचे सुपुत्र डीएसपी प्रवीणकुमार पाटलांकडून धुळेकरांची हीच अपेक्षा आहे.
तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
उंटावद प्रतिनिधी :- शिरपूर खर्दे बुद्रुक रस्त्यावरील अरुणावती नदी पुलावर मोठमोठे खड्डे पडले असून सळई देखील बाहेर निघाल्या आहेत. या भल्या मो...
-
अमळनेर : चोपडा रस्त्यावर गावठी पिस्टल विक्री होत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी छापा टाकून दोन तरुणांना दोन गावठी पिस्टल ,सहा ज...
-
वासरे ता अमळनेर येथे अतिवृष्टी व ढगफुटीत नुकसान व दैनंदिन जिवन विस्कळीत झालेल्या नागरिकांना कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचा...
-
पारोळा पोलिसांची धडक कारवाई , ४० लाखाचा मुद्देमाल जप्त अमळनेर : पारोळा तालुक्यातील बहादरपूर येथे बोरी नदीच्या काठावर पोलिसांनी धा...
-
“अमळनेर नगरपरिषद प्रभाग क्रमांक ३ मधील दलित-मागासवर्गीय वस्तीवर अन्यायकारक प्रभाग रचना.. अमळनेर(प्रतिनिधी)अमळनेर नगरपरिषद निवडणु...
-
मयत । अमळनेर : मुलाने सख्ख्या बापाच्या डोक्यात लोखंडी हातोडी टाकून त्याचा खून केल्याची घटना ३१ रोजी रात्री साड...
-
.अमळनेर :-प्रतिनीधी तालुक्यातील मारवड मंडळात ता.२९ रोजी १२० मि.मी.पाऊस झाल्याने वासरे येथील वस्तीत पाणी शिरल्याने सुमारे ८२ घरात...
-
प्रतीनिधी :- गणेश चव्हाण दिनांक 25 ऑगस्ट रोजी आधार संस्था अमळनेर तर्फे बालसंगोपन योजनेच्या लाभ घेणाऱ्या बालक व त्यां...
-
शिरपूर प्रतिनिधी : थाळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हिसाळे गावात पोलिसांनी मोठी कारवाई करत जुगार अड्ड्यावर छापा टाकला आणि गावठी दारूची हातभट...
-
जळगाव प्रतिनिधी:- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा स्वीय सहाय्यक असल्याचे सांगून एका दाम्पत्याने जळगाव शहरातील तब्बल १८ नागरिकांची सुमारे ५५ ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा