Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!
शुक्रवार, ३१ डिसेंबर, २०२१
Home
/
Unlabelled
/
दोंडाईचा येथे ३१ डिसेंबरच्या पुर्वसंध्येला मुंबई-धुळे-शिरपुरच्या राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी उचकवला बनावट देशी-विदेशी दारूचा गोडाऊन.... दीड लाखाचा मालासह आरोपी अटकेत,आणखी साथीदार असण्याची चिन्हे....
दोंडाईचा येथे ३१ डिसेंबरच्या पुर्वसंध्येला मुंबई-धुळे-शिरपुरच्या राज्य उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनी उचकवला बनावट देशी-विदेशी दारूचा गोडाऊन.... दीड लाखाचा मालासह आरोपी अटकेत,आणखी साथीदार असण्याची चिन्हे....
दोंडाईचा- येथे ३१ डिसेंबरच्या पुर्वसंध्येला म्हणजे दिनांक २९ डिसेंबर रोजी मुबंई राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त श्री कांतीलालजी उमाप,मा.संचालक श्रीमती ऊषा वर्मा मँडम,नाशिक येथील विभागीय आयुक्त श्री अर्जुनजी ओहोळ,धुळे अधीक्षक सौ.सिमा झावरे मँडम व शिरपुरचे प्र.निरीक्षक पी.एस.पाटील यांच्या भरारी पथकाने दोडाईचा गावात लक्ष्मी मंदिरजवळ शिवराय चौकात मालपुर रोड पाण्याचा टाकीजवळ पक्क्या घराची तपासणी केली असता त्यामध्ये बनावट (ड्युब्लीकेट-नकली) देशी विदेशी मद्य बनविण्याचे साहित्य, मद्यार्क व बनावट देशी तयार बाटल्या गोडाऊनमध्ये मिळून आल्या आहेत.
सदर दारूबंदी गुन्ह्यातील मुद्देमाल मिळून आल्याने पंचनामा करून जप्त करण्यात आला आहे. तसेच घटना स्थळावरुन आरोपी नामे महेंद्र संतोष पाटील वय-२७ रा.- डाबरी घरकुल,दोडाईचा यास अटक करण्यातआली.
सदर गुन्ह्यातील जप्तमुद्देमाल पुढीप्रमाणे
१)१२०९६०/- देशीदारु टांगो पंच १८० मि.ली.च्या(बनावट मद्याच्या) एकूण २०१६ सीलबंद बाटल्या प्रत्येकी कीमंत ६० प्रमाणे अं.की.रू.
२)१२५०० एक २५ लिटर क्षमतेचा प्लॅस्टिक ड्रम पूर्ण विदेशी दारू तयार ब्लेंड ने भरलेला अं.की. रु.
३)१५००/-एक २५ लिटर क्षमतेचा प्लॅस्टिक ड्रम पूर्ण स्पिरीट ने भरलेला अं.कि.रु.
४)११००/- ओ.सी.ब्लू व्हिस्की विदेशी दारूचे जिवंत बुचे प्रत्येक नग ५/- प्रमाणे अं. कि.रू.
५)६९०/- देशी दारू टगो पंच लेबल असलेल्या १८० मि.ली. क्षमतेच्या एकूण ३४५ रिकाम्या बाटल्या प्रती नग २/- रुपये प्रमाणे अं. कि. रु.
६)११००/- खाकी रंगाचे एकूण ११० पुठ्ठे अं. कि. रु.
७)५००/- एक लिटर क्षमतेची इसेन्स ने भरलेली प्लॅस्टिक बाटली अं. कि. रु.असा एकूण एक लाख अठोतीस हजार तीनशे पन्नास रूपयांचा माल हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही श्री. पी. एस.पाटील प्र. निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क शिरपूर, आर. आर. धनवटे निरीक्षक रा उ शु धुळे, श्री.सचिन गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक दोंडाईचा पो.स्टे.,श्री. व्ही. एम. पाटील दुय्यम निरीक्षक रा उ शु वि.भ. प.नाशिक, सहाय्यक दुय्यम निरीक्षक अनिल निकुंभे,जवान सर्वश्री एस. एच.देवरे, के. एम. गोसावी, भाऊसाहेब पाटील, जितेंद्र फुलपगारे, दारासिंग पावरा, गोकुळ शिंदे, भाऊसाहेब घुले, लोकेश गायकवाड, कॉन्स्टेबल प्रविण धनगर, वाहन चालक श्री. व्ही. बी. नाहिदे,निलेश मोरे यांच्या पथकाने केली असून पुढील तपास श्री. पी. एस.पाटील,दुय्यम निरीक्षक, शिरपूर हे करीत आहेत.
तरुण गर्जना वृतपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे
Tags

About Tarun Garjana
तरुण गर्जना या ऑनलाईन ई-वृत्तपत्राचे मुख्य संपादक: श्री. संतोष गंभीर भोई - महाराष्ट्र पत्रकार संघ, धुळे जिल्हाध्यक्ष तसेच महाराष्ट्र विकास माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार संघटना महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष.
सदर ऑनलाईन ई-वृत्तपत्र शिरपूर येथून एकाच वेळी महाराष्ट्रात सर्वत्र प्रसारित होते. या ऑनलाईन पोर्टल मध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक मंडळ सहमत असेलच असे नाही. (शिरपूर न्यायक्षेत्र)
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
प्रसिद्ध
-
अमळनेर (प्रतिनिधी) अल्पवयीन मुलीशी प्रेमसंबंध ठेवून तिला सात महिन्यांची गर्भवती करणाऱ्या धरणगाव तालुक्यातील निशाणे येथील तरुणांव...
-
शिरपूर प्रतिनिधी : थाळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील हिसाळे गावात पोलिसांनी मोठी कारवाई करत जुगार अड्ड्यावर छापा टाकला आणि गावठी दारूची हातभट...
-
रासायनिक खतांचा शेतीत वापर केल्यामुळे 1970 ते 2000 या 4 दशकात शेती उत्पन्न वाढत गेले, पण बागायती व सिंचनाच्या सोयी मोठ्याप्रमाणात उपलब्ध झ...
-
बेटावद (ता. शिंदखेडा) : बेटावद परिसरात शेतकऱ्यांवर अन्यायकारक प्रकार घडल्याची धक्कादायक घटना नुकतीच उघडकीस आली आहे. गावातील शेतकरी मनोज दोधू...
-
त-हाडी प्रतिनिधी :-भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयाच्या निर्देशानुसार संपूर्ण भारतात राबविण्यात येत असलेल्या आर्थिक समावेशन मोहिमेअंतर्गत सेंट्...
-
अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील अंबारे येथील कर्तव्यावर शहीद झालेल्या जवानावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी कुटुंबियांसह ग्...
-
त-हाडी (ता. शिरपूर):नाभिक समाजाचे आराध्य दैवत व भक्तीमूर्ती संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त त-हाडी येथे दिनांक ...
-
प्रतीनिधी :- गणेश चव्हाण दिनांक 25 ऑगस्ट रोजी आधार संस्था अमळनेर तर्फे बालसंगोपन योजनेच्या लाभ घेणाऱ्या बालक व त्यां...
-
अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडून महसूल दफ्तरी केले जमा ब्राह्मणे पोलिस पाटील गणेश भामरे यांची धाडसी कारवाई अमळनेर प्रतिनि...
-
अमळनेर : सख्या अल्पवयीन मुलीशी अश्लील कृत्य करणाऱ्या धुळे येथील एका विरुद्ध पोस्को कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा