Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

शुक्रवार, ३१ डिसेंबर, २०२१

३१ डिसेंबर २०२१ नांदेड-मनमाड ब्रॉडगेजच्या दुहेरीकरण्याच्या सर्वे करण्यास मान्यता -केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे



जालना  : गेल्या अनेक दिवसापासून नांदेड मनमाड ब्रॉडगेज दुहेरीकरण व्हावे अशी मागणी राजकीय पक्ष व संघटनातून केली जात होती, अनेक आंदोलने झाली परंतु या प्रयत्नाला यश आले नाही. रेल्वे राज्यमंत्री पद माननीय रावसाहेब पाटील दानवे यांना मिळाल्यामुळे मराठवाड्यातील जनतेच्या त्यांच्याकडून अपेक्षा वाढल्या, प्रत्यक्षात या मार्गावर मालवाहतूक कमी असल्यामुळे दुहेरीकरण नाकारण्याच्या बातम्या अनेक दिवसांपासून वृत्तपत्रात आलेल्या होत्या. परंतु रेल्वे राज्यमंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे यांनी मराठवाड्यातील जनतेच्या भावना लक्षात घेऊन सदर विषयाबाबत रेल्वे विभागाचा आढावा घेतला आणि अम्ब्रेला या योजनेअंतर्गत 98 किलोमीटर दुहेरीकरणाला मान्यता देऊन 17 डिसेंबर 2021 रोजी सदर दुहेरी करण्याचा सर्वे करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला व त्वरित सर्वे पूर्ण करून अंदाजपत्रक विभागाला सादर करण्याचे आदेश दिले.
अम्ब्रेला योजनेत रेल्वेची विविध कामे जसे की रुंदीकरण, दुहेरीकरण व अन्य काही कामे करण्यास एकत्रितपने निधी दिला जातो, या योजनेत कोणते काम करायचे आहे याचा सर्व अधिकार रेल्वे बोर्डाला असतो, परंतु कामाची रक्कम 1000 कोटी पेक्षा कमी असावी अशी त्यात अट असते, 1000 कोटी पेक्षा जास्त खर्च एखाद्या प्रकल्पाला लागत असेल तर त्याकरिता विभागाला निती आयोग व केंद्रीय मंत्रिमंडळासमोर सदर विषय न्यावा लागतो म्हणून नांदेड-मनमाड दुहेरीकरणाच्या कामाला केंद्रीय मंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे यांनी यात हा विषय निती आयोग व केंद्रीय मंत्रिमंडळासमोर न जाऊ देता अम्ब्रेला योजनेअंतर्गत 98 किलोमीटर कामाला रेल्वे बोर्डाकडून मान्यता मिळवून दिली याचा खर्च एक हजार कोटी पेक्षा कमी आहे. त्यानुसार सर्वे चे काम सुरू करण्याचे आदेश देखील विभागाला दिले. या व्यतिरिक्त शिल्लक असलेले मार्ग दुसऱ्या टप्प्यात या अम्ब्रेला योजनेअंतर्गत घेऊन पूर्ण करण्याचे नियोजन देखील केले आहे.
आपल्या अधिकारात एकाच कामाचे दोन टप्प्यात विभागणी करून निती आयोग व केंद्रीय मंत्रिमंडळापुढे सदर विषय न जाऊ देता कमी वेळेत कामे पूर्ण करून घेण्यासाठी केंद्रीय मंत्री ना.रावसाहेब पाटील दानवे यांनी हे निर्णय घेतले असल्याचे समजते. ज्यामुळे मराठवाड्यातील नांदेड-मनमाड रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाचा प्रश्न सुटला आहे.

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

प्रसिद्ध