Breaking News युवा शक्तीचा बुलंद आवाज..! बातमी मागील सत्य..!

सोमवार, २७ डिसेंबर, २०२१

सोनगीर ते विसरवाडी राष्ट्रीय महामार्ग मंजूर झाला, आणि अचानक शेतामध्ये फळबाग झाडे उभी राहिली कशी ?



धुळे जिल्ह्यातील सोनगीर ते विसरवाडी राज्य महामार्गाचे रूपांतरण राष्ट्रीय महामार्गात झाले म्हणून रस्ता चौपदरी करण होणार हे निश्चित असल्यामुळे रस्त्याच्या लगत असलेल्या जमिनी रस्ता रुंदीकरणात जाणार हे निश्चित असल्याने त्याचा थांगपत्ता शेतकर्याना नाही राष्ट्रीय महामार्ग होणार याची माहिती सर्वात आधी राजकीय पुढारी आणि दलाल व अतिश्रीमंत व्यापार्यांना होते हे आश्चर्य खरे गरजवान ज्यांच्या जमिनी आहेत त्या शेतकर्याना याची माहिती खुप उशिरा मिळते तोपर्यंत शेतकर्याच्या जमिनी कवळीमोल दराने दलालांमार्फत राजकीय पुढारी व अतिश्रीमंत व्यापारी घेऊन घेतात व त्या जमिनींवर एका रात्रीत फळबाग अर्थात जाम, सीताफळ पपई सारखे झाडे लाऊन अचानक मोठे होतात असाचं प्रकार सध्या सोनगीर ते विसरवाडी राष्ट्रीय महामार्ग मंजूर झाल्यामुळे सुरू आहे हा राष्ट्रीय महामार्ग धुळे व नंदुरबार जिल्हातुन जात आहे त्यामुळे धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील राजकीय पुढारी आणि दलाल व अतिश्रीमंत लोकांनी कमी किमतीत जमिनी खरेदी करण्याचा सपाटा लावला आहे त्यांना दलाल गरजु शेतकर्याची शेती शोधुन देतात हे दलाला गरजु शेतकर्यांचा शोध घेत वेगवेगळे आमिष दाखवून जमिनी हळप करण्यामध्ये माहिर आहेत राष्ट्रीय महामार्ग झाल्यामुळे शेतकरींच्या जमिनींना बाजार भावापेक्षा चारपट जास्त दर मिळतो ज्या जमिनी बागायत नाही त्या जमिनी अचानक बागायती झाल्या बागायती जमिनी व फळबाग असेल तर जास्त मोबदला मिळतो म्हणून अचानक लुटारूंची टोळी शेतकर्याच्या मागे फिरतांना दिसत आहे यांत दोंडाईचातील राजकीय पुढारी आणि दलाल व अतिश्रीमंत व्यापारी या कामात सर्वात पुढे आहेत....

तरुण गर्जना वृत्तपत्र सह
चंद्रशेखर अहिरराव धुळे

1 टिप्पणी:

  1. बातमी घेतली धन्यवाद पण बातमी माझी आहे माझे नाव घेतले असते तर बर झालं असतं

    उत्तर द्याहटवा

प्रसिद्ध